अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गाळप शुभारंभास महंत रामगिरी जाणार ?
घाडगे न्यूज - प्रतिनिधी
महंत नारायणगिरी महाराजां नंतर महंत रामगिरी महाराज अतिशय सुंदर भक्तांचे आध्यात्मिक प्रबोधन करीत आहेत.
असे असताना भक्तांनी महंत रामगिरी यांना एका निवेदना व्दारे प्रबोधन केले असून अशोक सहकारी साखर कारखान्यावर महंत रामगिरी यांचा अवमान झाला होता हे महंत रामगिरी कदाचित विसरले असतील मात्र भक्तगण नाही व आता महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते अशोकचा गाळप हंगाम सुरु होणार असून रामगिरी याच्या हस्ते गाळप हंगाम शुभारंभ होणार असून याला महंत रामगिरी यांनी जाऊ नये असे त्यांना वाटते
ज्याच्या अधिपत्याखाली अशोक चालतो ते महिलीलेवर अन्याय
अत्याचार केल्याच्या आरोपा वरून अटक होते.
कदाचित साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असल्याने यावर असंख्य ऊस उत्पादक शेतकरी, कष्टकरी कामगार यांचे भवितव्य अवलंबून असल्याने महंत रामगिरी मोठ्या मनाने कार्यक्रमास उपस्थित राहणार असतील मात्र हे उचित आहे का
हेच ते पत्र
प्रती.
प. पू. महंत रामगिरीजी महाराज,
मठाधिपती, सदगुरू गंगागिरी महाराज संस्थान,
श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट, साराला.
३०/१०/२०२५.
साष्टांग दंडवत,
परम पूज्य संत गंगागिरी महाराजांच्या गादीचे आम्ही परम भक्त असून पूज्य महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गक्रमण करीत असताना सत्य निती, चरीत्र, मानवता, कर्मयोग, प्रेम, बंधूभाव, दिनदुबळ्यांची सेवा या महाराजांच्या तत्त्वांचे पालन करत कष्टकरी आणि शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्नशील आहोत.
शनिवार दिनांक १/११/२०२५ रोजी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या शुभारंभासाठी आपणास आमंत्रित केल्याचे समाज माध्यमातून समजते. निमंत्रण स्वीकारू नये असे आम्ही कदापीही सुचवणार नाही कारण आमची ती कुवत नाही परंतु प.पू महाराज, भ्रष्टाचारी, नितीमूल्य गमावलेल्या, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकलेल्या व्यक्तीला पाठबळ देणे योग्य ठरत नाही. आपण श्रध्दास्थान आहात, आपल्या श्री मुरकुटे यांना आशिर्वाद देण्याने सराला बेटाच्या श्रध्दास्थानाला गालबोट लागेल अशी या परिसरातील भाविकांची भावना आहे.
काळ बदलतो, समाज बदलतो पण संतांची तत्वे कधीच बदलत नाही. संत हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. सराला बेट व आपण पंचक्रोशितील लाखो भक्तगणांचे श्रध्दास्थान आहात.अनितीला थारा देवू नये असे अध्यात्म सांगते.तसेच नितीवानांना पाठबळ द्यावे अशी प्रेरणा देते.माञ आपण श्री मुरकुटे यांच्यासारख्या नितीमुल्ये गमावलेल्या व्यक्तीला आशिर्वाद देणे हे अनितीचा उध्दार ठरेल.याच मुरकुटे यांनी अशोक कारखान्याच्या एका गळित हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात अध्यात्मावर अनिष्ट भाष्य व टिपणी केली होती. त्यावेळी आपण तेथून कार्यक्रम त्यागून निघून गेला होता, हे भक्तगण विसरलेले नाहीत. केवळ राजकीय स्वार्थासाठी श्री. मुरकुटे हे सराला बेटाचे उंबरठे झिजवत आहेत. त्यांना अध्यात्माविषयी वा बेटाविषयी कोणतीही आत्मियता नाही. असे असताना आपण श्री मुरकुटे यांचे निमंञणाचा स्विकार करुन अनीतीला अधिष्ठान द्यावे की नाही याचा विचार कराल,असे आम्हा भक्तगणाला वाटते. तसेच आपण जाणारच असाल तर कारखाना व्यवस्थापनाला मागील हंगामाचे ३०० रुपये प्रतिटन व यावर्षी गळीतास येणाऱ्या उसाला ३५५० रुपये प्रतिटन कष्टकरी शेतकऱ्यांना दर देण्याचा आदेश द्यावा ही नम्र विनंती.
llजयहरीll
आपले
शेतकरी व कष्टकरी भक्त
Comments
Post a Comment