देवळाली प्रवरा नगरपालिकेत सत्तेत- जित कोणाची !
स्पेशल रिपोर्ट
घाडगे न्यूज @पत्रकार शिवाजी घाडगे
स्वच्छतेत नावलौकिक मिळवलेली नगरपालिका 20 हुन अधिक राज्य व केंद्रसरकार ची बक्षीस प्राप्त राज्यात नावलौकिक प्राप्त नगरपालिका देवळाली प्रवरा नगर पालिका होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकी मुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून सोशल मीडियावर " वार "सुरु झाले असून भाजपा व विरोधात सारे असे चित्र असून भविष्यात कोणकोणते पक्ष आपले झेंडे घेऊन राजकीय मशागत करतात
राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणार की स्थानिक मंडळार हे देखील पाहणे उसुकत्तेचे असणार आहे तसे सगळेच्या प्रभागात उमेदवार उभे करण्या साठी सातत्य असावे लागते येथे फॉलोअर्स पेक्षा प्रत्यक्ष मतांवर अवलंबून असते राजकीय मतभेद दुर ठेवून सत्तेचा सारीपट कोण कसा खेळणार अथवा कोण कोणाच हिशोब चुकता करणार संध्या नवीन पिढीच्या हातात राजकीय सुत्रे आली आहेत
देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे खुले राहील्याने खुल्या चर्चा संध्या सुरु असुन
अभी नही तो कभी नही या वृक्ती प्रमाणे अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत संध्या या नगर पालिकेवर भाजपाचे वर्चस्व असून माजी आमदार तथा शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष जेष्ठ नेते चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव सत्यजित कदम हे पाच वर्ष बिनबोभाट नगराध्यक्ष खुर्चीवर राहीले तसा त्यांचा कारभारावर विरोधकांनी कधी आवाज उठवला नलल्याने चांगला म्हणायचा का सत्यजित यांचे वडील चंद्रशेखर कदम हे देखील त्यावेळेस विरोधकांचे एक मत घेऊन याच पालिकेचे नगराध्यक्ष झाले होते नंतर ते राहुरीचे आमदार देखील झाले तसे कदम पिता पुत्र हेच तालुक्यात भाजपाशी प्रामाणिक आहेत तसे माजी प्रात सदस्य आसाराम ढुस देखील आहेतच मात्र चंद्रशेखर कदम व आसाराम ढुस यांच्यात पतसंस्था वरुन मत भेद झाले तस चंद्रशेखर कदम यांना त्यावेळेस फेर मत मोजणी साठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जो अर्ज दाखल केला तो आसाराम ढुस यांनीच मग अंधार झाला अण अधरात राहुरीत कमळ फुलले
राहुरीचे दिवगंत नेते रामदास धुमाळ यांचे आमदार होण्याचे स्वप्न सत्यात उतरले नाही पुढे माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी अवघ्या सहाशे मतानी कदमा विरोधात आमदार म्हणून निवडून आले नंतर पुन्हा चंद्रशेखर कदम भाजपाचे आमदार झाले म्हणजे भाजपाचे कमळ कदम यांनी राहुरी विधानसंभा मतदार संघात फुलविले नंतर मतदार संघ तोडफोड झाले पारनेर मतदार संघ फुटत होता जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे संभाजीनगर येथे लवादा समोर उभे राहून योग्य बाजु माडत पारनेर आबादीत ठेवण्यात यशस्वी झाले अण राहुरीचे 32 गावे श्रीरामपूर विधान संभा मतदार संघात समाविष्ट झाले माजी आमदार व शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष दिवगंत नेते जंयत ससाणे यांनी लक्ष लाघुन देवळाली प्रवरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस चे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष केले नंतर थेट लढतीत भाजपाची केंद्र व राज्यातील सत्ते मुळे सत्यजित कदम काँग्रेस चे गणेश भांड व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ऐनवेळेस उभे राहीलेले माजी नगराध्यक्ष दिवगंत बाळासाहेब चव्हाण यांचा साडे नऊ हजार मतानी पराभव करीत एक हाती सत्ता सत्यजित यांनी काबीज केली तसे मागील पंचवार्षिक मध्ये काॅगेस व राष्ट्रवादीला खाते देखील उघडता आले नाही तेव्हा विश्वास जुना पुन्हा येणार का कारण विश्वास याना बळ देणारे आता आपल्या चिरंजीव सचिन साठी आग्रही आहेत माजी नगराध्यक्ष दिवगंत गुलाबराव कदम यांचे चिरंजीव देखील फार काही करिष्मा दाखवु शकले नाहीत यामुळेच सत्यजित सर्वात भारी म्हणत आपली जागेवर विश्वास ठेवून आहेत राहुरी बाजार समितीत ते एकटेच निवडुन आले
श्रीरामपूर काँग्रेस आमदार हेमंत ओगले पुढच्या राजकीय समीकरण साठी काँग्रेस उमेदवार कोण देतात हे बघावे लागेल शिवसेना उध्दव सेना, बहुजन वंचित, आर पी आय, माजी आमदार लहु कानडे, शिवसेना शिंदे गटाचे सागर बेग, बच्चुभाऊ कडु यांची प्रहार या सह डझनभर अपक्ष उमेदवार सथ्या देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर डोळा ठेवून आहेत .
यावेळेस निवडुन जाणार्या नगरसेवकांना विधान परिषद आमदारकीला मतदार करता येणार असल्याने विषेश महत्व प्राप्त झाले असून सत्तेत येण्या साठी सत्यजित कदम यांना काही राजकीय तडजोडी स्विकारयाव्या लागतील मागील निवडणुकीत राष्ट्रवादी मधुन भाजपच्या तिकीटावर नगरसेवक झालेले सत्यजित यांच्या पासून केव्हाच दुर गेल्याने कदम यांना कदम सभाळुन निर्णय घ्यावे लागतील काही समीकरण जुळवून घ्यावे लागतील देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक मोठी चुरशीची व रंगतदार होईल मात्र सत्तेत सत्यजित जित होईल का विरोधक त्यांची सत्ता काबीज करण्यात यशस्वी होतील
नगर मनमाड महार्गावर भाजपाच्या योजनांचा प्रचार करणारे सत्यजित कदम यांना भाजपा मदत करणार का की अंर्तगत मतभेदातुन
देवळालीत निविन लंके जन्माला घालणार कारण देवळाली प्रवरातचा नगराध्यक्ष तालुक्याचा आमदार होतो हा इतिहास असून कोण बनेगा नगराध्यक्ष
Comments
Post a Comment