भंडारदरा धरणातून शेतीचे चार आर्वतने सोडणार
- भंडारदारा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निळवंडे कालव्यांना १५ जानेवारी पासून पाणी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
भंडारदारा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक लोणी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात संपन्न झाली. याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ किरण लहामटे आमदार अमोल खताळ आ.हेमंत ओगले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, स्वप्निल काळे, निळवंडे प्रकल्पाचे अभियंता बाळासाहेब शेटे, कैलास ठाकरे आदी उपस्थित होते.
भंडारदरा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्यातून सध्या सिंचन बिगर सिंचनाचे आवर्तन सुरू आहे. येणाऱ्या काळात २० फेब्रुवारी ते २४ मार्चमध्ये पुढचे आवर्तन करण्याचे नियोजन असून,२४ मार्च ते ३० एप्रिल मध्ये दुसरे आवर्तन आणि शिल्लक पाण्यातून जूनमध्ये एक आवर्तन कसे होईल, याचेही नियोजन विभागाने केले असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिली.
Comments
Post a Comment