अंकशास्त्रातून अंगशास्त्रात भोगू जोरात

अंकशास्त्रातून अंगशास्त्राकडे 
 अंधश्रद्धेचा भयावह चेहरा
श्रध्देचा बाजार। शिवाजी घाडगे
भोगू कॅप्टन अशोक खरात चे बिग फोडणारा निरज जाधव याला पोलीसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे त्यामुळे भक्कम पुरावे  बरीच माहीती त्याच्या कडून पोलीसांना तपासात मिळेल. दरम्यान शिर्डी पोलीसांना देखील एस आय टी ने धारेवर धरले असून चाक निखळुन पडणार आहे. 
 नाशिकमधील बहुचर्चित भोगू बाबा अशोक खरात यांच्या कृत्यांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. स्वतःला अध्यात्म, अंकशास्त्राचा आव आणत त्यांनी भोळ्या-भाबड्या भक्तांची फसवणूक केली आणि त्याच वेळी स्वतः मात्र ऐशोआरामात जगत राहिला. त्यांच्या सान्निध्यात गेलेल्या अनेकांच्या आयुष्याचा चक्काचूर झाला; काहींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, तर काहींच्या कथांनी समाज सुन्न झाला आहे. तब्बल ५८ महिलांवरील अत्याचारांच्या चित्रफिती पेनड्राइव्हमध्ये आढळल्याची माहिती धक्कादायक आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात एका ऑफिस बॉयने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समजते.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत विशेष तपास पथक  नेमण्यात आले असून तपास महिला अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील निवासी असल्या तरी 
 या लढाईत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूळ फिर्यादीने शेवटपर्यंत ठाम राहणे. कारण भोगू अशोकच्या पाठीशी काही प्रभावशाली आणि नामांकित व्यक्ती उभ्या असल्याचेही बोलले जाते.
आज समाजात अंधश्रद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रत्येकाला कष्ट न करता सुख, ऐश्वर्य आणि झटपट यश हवे आहे. कुणाला नोकरी मिळत नाही, कुणाचे लग्न जमत नाही किंवा टिकत नाही, कुणाला मूल होत नाही, तर कुणाला निवडणुकीत यश हवे असते. अशा प्रत्येक समस्येचे ‘चमत्कारीक’ समाधान शोधताना लोक तथाकथित  भोदु बाबांच्या जाळ्यात अडकतात. आणि इथूनच सुरू होतो शोषणाचा काळा खेळ.
विशेषतः महिलांनी कोणत्याही परपुरुषाच्या पायाला स्पर्श करणे ही परंपरा नसून चुकीची मानसिकता आहे; आणि अशा बाबांच्या पायावर डोके ठेवणे तर अत्यंत घातक आहे. श्रद्धा ही आंधळी नसून डोळस असायला हवी. अन्यथा, अशोकसारखे ‘अंकशास्त्रज्ञ’ नावाखाली ‘अंगशास्त्रात’ घुसणारे विकृत प्रवृत्तीचे लोक समाजात निर्माण होतात.
अशा अनेक घटनांमधून एकच स्पष्ट होते विज्ञानयुगातही आपण अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकत आहोत. या प्रवृत्तीला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा, अशा नालायक लोकांकडून समाजाचे शोषण सुरूच राहील आणि त्यांना पोसणारी मानसिकताही तितकीच जबाबदार ठरेल.
आता तरी जागे होण्याची वेळ आली आहे. गावा आवात असे अडाणचोट स्वयंघोषित महंत तयार झाले असून ते भोळ्या भाबड्या भक्तीचा गैर फायदा हे चोर उठवत आहेत पोलीस अंशावर सोमोटो व्दारे कारवाई करायला हवी अनेक ठिकाणी धर्मातर देखील होत असून
जनतेनेच आता शहाणे व्हायला हवे नाहीतर आपल्या सारखे आपणच मुर्ख कारण देता घेता नरका जाती तसे अशा आश्रमात जाणारे नरका जाती खरात चे जे काही व्हायचे आहे ते होईल देखील मात्र आत्ता वातावरण खराब झाले मात्र माजी मुख्यमंत्री व भावी मुख्यमंत्री यांचे फोटो अशोक बरोबर फिरतात म्हणजे आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काही चालेना 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर