भोगू अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओ ओळख पटेल अशा फिरवल्यावर कारवाई
श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे
उशिरा का होईना, पण कठोर कारवाईची गरज आहे
भोगू अशोक खरात प्रकरणात प्रशासनाने जर सुरुवातीपासूनच तत्परता दाखवली असती, तर महिलांवरील अत्याचार काही प्रमाणात तरी रोखता आले असते, अशी तीव्र भावना समाजातून व्यक्त होत आहे. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही. या प्रकरणाचा तपास योग्य, निष्पक्ष आणि प्रामाणिक पद्धतीने करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देणे हीच काळाची गरज आहे.
या प्रकरणात अशोक खरात याचे व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्या क्लिप्समधून काही महिलांची ओळख पटल्याचा ठपका ठेवत तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील दोन जण आणि बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे.
मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झालेल्या असताना, केवळ काही व्यक्तींवर कारवाई करणे पुरेसे ठरणार नाही. जर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल करायचा ठरवले, तर संपूर्ण राज्यावरच गुन्हे दाखल करावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे या प्रकरणात मूळ गुन्हेगारांवर आणि अशोक खरात याला थेट किंवा अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करणे अधिक महत्त्वाचे आहे.
पोलीस प्रशासनानेही या प्रकरणात अधिक धाडस दाखवणे आवश्यक आहे. सुरुवातीलाच पोलीस निरीक्षकांनी स्वतःहून (सुओ मोटू) गुन्हा दाखल केला असता, तर या प्रकरणाचे गांभीर्य लवकर लक्षात आले असते. मात्र, सोशल मीडियावर संतापाची लाट उसळल्यानंतरच या प्रकरणाला वेग आला, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
या संपूर्ण प्रकरणात समाजातील अनेक स्तरांवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यकर्ते, मंत्री, अधिकारी आणि उच्चशिक्षित व्यक्ती देखील अशोक खरात याच्या प्रभावाखाली असल्याचे चित्र समोर आले. अनेकांनी त्याच्यावर अंधश्रद्धेने विश्वास ठेवत त्याला उंचावर नेले. मात्र, जेव्हा अंकशास्त्राच्या आडून चालणारे अनैतिक प्रकार उघडकीस आले, तेव्हा समाजात तीव्र संताप निर्माण झाला.
या संदर्भात काही व्यक्तींनी यापूर्वीच आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. व्हिडिओ क्लिप्स समोर आणून सत्य मांडण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्या वेळी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले किंवा त्याची दखल घेण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा आहे.
आजही समाजात अशा प्रकारची अनेक प्रकरणे घडत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत सत्य उघड होत नाही, तोपर्यंत अशा व्यक्तींना समाजात मान-सन्मान दिला जातो आणि त्यांना विविध उपाध्या लावून डोक्यावर घेतले जाते, हीच चिंतेची बाब आहे.
या पार्श्वभूमीवर आता समाजाने जागृत होण्याची गरज आहे. अंधश्रद्धेवर आंधळा विश्वास ठेवणे टाळून विवेकाने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, प्रशासनानेही अशा प्रकरणांमध्ये तातडीने आणि कठोर कारवाई करून समाजात कायद्याचा धाक निर्माण करणे गरजेचे आहे.झुकतीही दुनिया झुकाने वाला चाहिए
अनेक अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबिया सह जमीन खरेदी केल्या हे शोधून गुन्हे मात्र अद्याप दाखल झाले नाहीत हे ही गुन्हे दाखल करण्याचे धाडस प्रशासनाने दाखवणे गरजेचे आहे
ज्याला गरजे आहे त्याला रिव्हॉल्व्हर लायसन्स देताना याच्या हाताला रघतपिती फुटते येथे मात्र...
याने समाजातील लोकांना गडा घालून संपत्ती कमवली आहे यावर ही गुन्हे दाखल होण्याची वाट लोक पहात आहेत मात्र एका महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा बाकीच्यांचे काय ते मात्र गिरे तो भी नाक उपर अशा अविर्भावात शाहजुकी शिकवत आहेत खरात सारख्यांच्या नाग्या ठेचल्या नाहीतर हे समाज्याला नागडे केल्या शिवाय राहाणार नाही तेव्हा आता कोण्या लुंग्या सुग्यावर विश्वास ठेवू नका लोकांचे रक्त शोषणु पैसा कमवालतर जेल आहेच
Comments
Post a Comment