डोक्यावर छत्री व्यावसायची खात्री

डोक्यावर छत्री व्यावसायची खात्री 
वास्तव।शिवाजी घाडगे 
छत्रीखालील वास्तव दुसऱ्या कोणार छत्री धरण्या पेक्षा आपल्यावर छत्री लावून आपण पिकवलेला टरबूज आपणच विक्री करु तेव्हा पिकवुया तसचे विकवुया हा नवा बदल देखील शेतकरी महिलांनी स्वीकारला याचे कौतुक व्हायला हवे!
एका बाजूला बाबाबुवांच्या नावावर उभारले जाणारे आडंबर, त्यांच्या चरणी नतमस्तक होणारी गर्दी आणि त्यांच्यासाठी छत्री धरणारे भक्त; तर दुसऱ्या बाजूला उन्हाच्या कडक झळा सहन करत स्वतःवर छत्री लावून रस्त्यावर टरबूज विकणारी शेतकरी महिला ही दोन चित्रे आजच्या समाजातील तीव्र विरोधाभास अधोरेखित करतात.
सध्या जागतिक घडामोडींमुळे शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बसत आहे. टरबूजासारख्या हंगामी पिकालाही योग्य भाव मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर आणून थेट विक्री करावी लागत आहे. या परिस्थितीत त्या महिलेचा फोटो केवळ एक दृश्य नाही, तर तो शेतीव्यवस्थेतील वास्तवाचा जिवंत दस्तऐवज आहे.
या महिलेच्या कष्टात कोणताही दिखावा नाही, कोणतीही खोटी प्रतिष्ठा नाही. तिच्या घामाच्या प्रत्येक थेंबात प्रामाणिकपणा आहे. ग्राहकाला देव मानून सन्मानाने व्यवहार करणारी ही वृत्ती, आपल्या संस्कृतीतील खरी मूल्ये जपणारी आहे. ती कोणत्याही बाबांच्या आशीर्वादावर अवलंबून नाही, तर स्वतःच्या श्रमावर विश्वास ठेवते—हीच तिची खरी ताकद आहे.
दुसरीकडे, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या समाजात बाबाबुवांचे महत्त्व वाढत चालले आहे. त्यांच्या नावाखाली होणारा दिखावा, आर्थिक शोषण आणि मानसिक गुलामी ही चिंतेची बाब आहे. अशा वेळी या शेतकरी महिलेचा साधा पण प्रभावी संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो—कष्ट आणि स्वाभिमान यांना पर्याय नाही.
आज गरज आहे ती समाजाने या वास्तवाकडे डोळसपणे पाहण्याची. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे, तर ठोस धोरणांनी पाहिले पाहिजे. त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव, साठवणूक सुविधा आणि निर्यात सुलभता मिळाली, तरच अशा महिलांना रस्त्यावर उतरून आपला माल विकण्याची वेळ येणार नाही.
ही छत्री केवळ उन्हापासून बचाव करणारी नाही, तर ती स्वाभिमान, कष्ट आणि वास्तवाची सावली आहे शिवाय पैसे ऑनलाइन स्वीकारून नव्या अर्थव्यवस्थेला आपलेसे करते आता शेतकऱ्याची बायको देखील जे विकते तेच पिकवायला लागली आहे अण स्वतः विक्री देखील करायला घाबरत नाही तेव्हा विक्री साठी कोणावर विसबुन राहुन चालणार नाही 
शेतकरी महिलेच्या जिद्दीचा बोलका फोटो
आजच्या काळात अंधश्रद्धा, बाबाबुवांच्या आहारी जाणारी मानसिकता आणि त्यांच्याभोवती उभ्या राहणाऱ्या दिखावूपणाच्या कथा वारंवार समोर येत असताना, एका साध्या शेतकरी महिलेचा फोटो मात्र समाजाला वास्तवाची जाणीव करून देणारा ठरतो. कुण्या तथाकथित बाबावर छत्री धरण्यापेक्षा, स्वतःवर छत्री लावून ट्रॅक्टरवर टरबूज विकणाऱ्या या महिलेचा हा फोटो खऱ्या अर्थाने ‘बोलका’ आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर