भोगू बाबा खरातला पोसणारे कोण आणखी कितीजणाचे बोटे बिळात?

भोगू बाबां कॅप्टन अशोक खरात पोसणारे कोण कितीजणाचे बोटे बिळात?
श्रद्धेचा बाजार।शिवाजी घाडगे 
नाशिकमधील तथाकथित ‘भोगू बाबा’ उर्फ कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली असली, तरी या प्रकरणाकडे केवळ एखाद्या व्यक्तीच्या विकृत कृत्यांपुरते मर्यादित पाहणे ही मोठी चूक ठरेल. “साप, साप” म्हणून भुई बडवण्यात काही अर्थ नाही; कारण इथे प्रश्न केवळ एका ‘सापाचा’ नाही, तर त्याला पोसणाऱ्या आणि त्याच्या विषारी अस्तित्वाला बळ देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेचा आहे.
 या प्रकरणात केवळ “साप, साप” म्हणून भुई बडवून काहीही साध्य होणार नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. खरातला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोसणारे, त्याला संरक्षण देणारे आणि त्याच्या प्रभावाला खतपाणी घालणारे नेमके कोण, हा खरा प्रश्न आहे. त्याने उभारलेली संपत्ती, निर्माण केलेला प्रभाव आणि त्याच्या संपर्कात आलेल्या महिलांची ओळख उघड होऊ नये
योग्यच मात्र हे संगळे प्रकरण सहमतीने होते असे नाही त्याने श्रध्देचा गैर फायदा घेतला आहे 
 अशीच सर्वांची मानसिकता दिसून येते. परंतु या सर्वामागे त्याने ‘भानामती’च्या खेळातून अनेकांच्या आयुष्यात खोलवर प्रवेश केला होता, हेही तितकेच वास्तव आहे.
हे प्रकरण समोर येताच काही जण दिल्लीतील भेटीगाठींचा उल्लेख करतात, तर काहीजण नाशिकमधील घडामोडींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात. राज्यात इतर कोणतेही प्रश्न उरले नाहीत का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लक्ष विचलित करण्यात आपण किती पटाईत आहोत, याचे हे जणू उदाहरणच आहे.
अशोक खरातने स्वतःभोवती एक ‘दैवी’ वलय निर्माण करण्यासाठी ईशानेश्वर देवस्थान उभारले. “ईश्वर माझ्यावर प्रसन्न आहे,” अशी बतावणी करून त्याने राजकीय नेते, मंत्री, अधिकारी आणि स्वतःला उच्चशिक्षित समजणाऱ्या लोकांनाही आपल्या जाळ्यात ओढले. या सर्वांनी त्याच्यावर दाखवलेला विश्वास हा केवळ अंधश्रद्धेचा परिणाम होता की त्यामागे काही वेगळे हितसंबंध होते, हा प्रश्नही अनुत्तरितच आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा राजीनामा घेतल्याने या प्रकरणाचे गांभीर्य कमी झालेले नाही. उलट, इतर संबंधित व्यक्तींनी दिलेली स्पष्टीकरणे अधिकच संशय वाढवणारी आहेत. त्यामुळेच कोणा कोणाचे बोटे बिळात हे शोधून एस आय टी काढणार का हा प्रश्न आहे 
कोणी बायको मुळे त्याच्यासोबत गेल्याचे सांगते, तर कोणी ‘रस्त्याच्या कामासाठी तो माझ्याकडे आला होता’ असे कारण पुढे करते. मात्र त्याचा ऑफिस बॉय निरज जाधव याने केलेल्या खुलाशांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. जेव्हा मोठ्या राजकीय व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले, तेव्हा नेहमीप्रमाणे निवेदने काढून स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न सुरू झाला.
तशा भोगू खरातने जोरात जमीन खरेदी केल्या आहेत त्या आपल्या बायको, मुलीच्या नावे व याला अधिकाऱ्याच्या बयका जोड घेतल्या आहेत त्यांना घेऊन तो आमवस्या, पोर्णिमेला यायचा अशी चर्चा आहे शिर्डी परिसरात देखील त्याची जमीन आहे शिर्डी जवळ त्याच्या मामाचे गाव आहे मात्र या परिसरात देखील त्याचे भक्त गण आहेत 
अंकशास्त्राच्या नावाखाली सुरू झालेला हा प्रवास पुढे ‘अंगशास्त्रा’पर्यंत पोहोचला आणि या भानामतीच्या खेळात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत, कॅप्टनचा कोट परिधान करून, अतिशय चलाखीने त्याने स्वतःभोवती एक प्रभावी प्रतिमा तयार केली. लग्न जमवण्यापासून ते संततीप्राप्तीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी लोक त्याच्यावर अवलंबून राहू लागले, ही समाजासाठी धोक्याची घंटा  नाही का?
याच संदर्भात संत तुकाराम महाराज यांचे विचार आजही तितकेच समर्पक वाटतात “राख अंगाला लावून पोर होत असतील, तर पती कशाला?” या ओळी अंधश्रद्धेवर थेट प्रहार करतात.
आता तरी समाजाने आणि विशेषतः अशा तथाकथित ‘बाबां’च्या भक्तांनी शहाणपणाने वागणे आवश्यक आहे. भविष्य आणि भूतकाळाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांच्या मागे धावण्यापेक्षा, चांगले कर्म आणि विवेक यांवर विश्वास ठेवणे हाच खरा मार्ग आहे.
सध्या लोक खाता पिता उठता बसता भोगू खरातच्या चर्चा चवीने करतात तर कुभ मेळ्या आगोदर माध्यम प्रतिनिचा देखील मेळा भरला आहे 
मोठ्या धेडा पर्यत तपास यंत्रणा जाणार का त्याने उभे केलेल्या साम्राज्य शासन ताब्यात घेणार का अशी देखील चर्चा आहे 
साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी दरम्यान एका मंत्र्याला पोलीसांनी गचाडले मात्र भोगू कॅप्टन अशोक खरात च्या मुळे हे प्रकरणा कडे देखील लोकांचे लक्ष गेले नाही म्हणजे भोगू खरात किती भिनलाय .
९५०३२७०२२४,७७७५८१६३८९
या हेल्पलाईन वर खरात विरोधात तक्रार दाखल करणाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर