सिल ठोकले रिपोर्ट आला निल

  सील ठोकले; आला रिपोर्ट ‘निल’ धक्कादायक वास्तव
श्रद्धेचा बाजार | शिवाजी घाडगे
स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला असून विशेष तपास पथकाने  खरातच्या कार्यालयासह इशान्येश्वर मंदिर परिसराला सील ठोकले आहे. या कारवाईदरम्यान तंत्र-मंत्राशी संबंधित साहित्य, उत्तेजक स्प्रे, दोरे, गंडे आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्तीमुळे प्रकरणातील संशय अधिकच गडद झाला आहे.
दरम्यान, सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे अशोक खरातचा एचआयव्ही तपासणी अहवाल ‘निल’ (निगेटिव्ह) आल्याची माहिती समोर आली आहे. अनेक महिलांवरील कथित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्याला एचआयव्ही संसर्ग झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, अधिकृत अहवालानंतर या चर्चांना आळा बसला असून संबंधितांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याचे समोर आले आहे. उत्तेजित औषधाच्या अती सेवनाने त्याला अर्धाग वायु चा झटका आला मात्र त्याच्याच भक्त डाॅक्टर ने तत्परता दिखवल्याने अशोक खरात बचावला 
अशोक खरातने अत्यंत आत्मविश्वासाने आणि कथित अध्यात्मिक प्रभावाच्या जोरावर भक्तांचा विश्वास संपादन करत मोठे जाळे उभे केले. कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या कार्यालयातून फॉरेन्सिक पथकाने जप्त केलेल्या वस्तूंमुळे या ‘श्रद्धा व्यवसाया’मागील वास्तव उघड होऊ लागले आहे. कार्यालयासह इशान्येश्वर मंदिर सील केल्याने तपासाची व्याप्ती वाढली असून या प्रकरणातील धागेदोरे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच अशोक खरात ने आपल्या कुटुंबातील सदस्य च्या नावे तसेच कोणाच्या भागीदारीत जमीनी खरेदी केल्या आहेत तसेच उत्पन्नाचे स्रोत देखील तपासले जाणार असून 
या प्रकरणातील आणखी एक गंभीर पैलू म्हणजे काही उच्चपदस्थ महिला अधिकारीही खरातच्या कथित करणी-भानामतीला बळी पडल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच काही अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही त्याने जाळ्यात ओढल्याच्या चर्चांनी खळबळ उडवली आहे. पोलिस पथक लवकरच त्याची सखोल चौकशी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
एसआयटी सध्या अशोक खरातच्या कथित अघोरी कृत्यांचे मूळ किती खोलवर रुजले आहे, याचा शोध घेत आहे. मात्र, या तपासाला गती मिळण्यासाठी पीडित महिलांनी पुढे येऊन आपली बाजू मांडणे अत्यंत आवश्यक असल्याचेही मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, अशोक खरात स्वतःला ‘फसवण्यात आले’ अशी भावना व्यक्त करत भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितले जाते. महिलांशी असलेली जवळीक ही ‘पूजेचा भाग’ असल्याचे तो सांगत असल्याची चर्चा आहे. त्याच्या दरबारात राजकीय व्यक्ती, उद्योगपती तसेच उच्चभ्रू वर्गातील लोकांची वर्दळ होती, ही बाबही आता तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.
गेल्या काही वर्षांत उभारलेले त्याचे साम्राज्य, इशान्येश्वर परिसरात विकसित केलेली आमराई आणि विविध विकासकामांमागील आर्थिक स्रोत यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तथापि, श्रद्धेच्या नावाखाली महिलांशी झालेले कथित अमानुष वर्तन हे कोणत्याही परिस्थितीत अस्वीकार्यच आहे.
अघोरी साठी वापर करीत असलेल्या वस्तु तसेच बळी तपास देखील महत्वाचा मानला जातो 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर