मी कशाला एसआयटीसमोर जाऊ ग
श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे
मी महिला आहे प्रवासात वेळ लागतो मी जाऊ शकले नाही हे कारण देत रुपाली चाकणकर एसआयटीसमोर गेल्या नसल्याचे समोर आले असून आता पुनर्निर्देश एसआयटीने केले असून भोगू अशोक खरात याच्या संस्थान वर रुपाली चाकणकर ह्या विश्वस्त असल्या कारणाने रुपाली चाकणकर याच्या कडुन अधिक माहीती मिळेल असे एसआयटी तपासी अधिकारी यामुळेच चाकणकर याचे जबाब घेणार
प्रचंड प्रमाणात अशोक खरात विषयी समाज्यात रोष असून कदाचित आपल्यावर देखील प्रवासात काही होऊ शकते याची भीती रुपाली चाकणकर याना असल्याने कदाचित एसआयटीच्या गाडीतून चाकणकर याना एसआयटीला आणावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
त्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी अशोक खरात प्रकरण महिलांशी निगडित असल्याने तपासात हलगर्जी पणा होणार नाही जे जे कोणी खरातला मदत केली व करत आहेत त्याची गय केली जाणार नाही यावर ठाम असून त्याच्या पत्नी अमृता फडणवीस यानी देखील एका सार्वजनिक कार्यक्रमात अशोक खरात प्रकरणी ना पसंती व्यक्त केली असून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे ह्या देखील याविषयावर जागृत आहेत पुरोगामी महाराष्ट्रात भोदुगिरी करुन असंख्य महिलांचा गैर फायदा घेणारा स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याला जास्त जास्त शिक्षा व्हायला हवी जेणेकरून दुसरा कोणी असे गैरकृत्य करणार नाही खरात महिलांकडे गेला नव्हत्या त्या त्याच्याकडे आल्या अस म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य कमी होणार नाही कारण व्हिडिओ क्लिप्स ह्या इतक्या भयानक आहे हा त्याच्या विधीचा भाग होणार नाही तसेच त्याने याचा आधार घेत उभे केलेले साम्राज्य तसेच मिळवलेली संपत्ती याची देखील योग्य तपास होणे गरजेचे आहे
आहेत तसेच शिर्डी येथे एका महिलेने अशोक खरात याचा ऑफिस कर्मचाऱ्यांवर फोटो व व्हिडिओ क्लिप्स टाकून बॅकमेल करीत असल्याची तक्रार दाखल असून याची सुनावणी देखील महिला आयोग घेणार होती दरम्यान एका स्थानिक वर्तमान पत्रा विरोधात चौकशी आदेश देखील महिला आयोगाकडून देण्यात आले होते त्या महिला आयोगाच्या तत्कालीन रुपाली चाकणकर याना एसआयटी समोर तपासाला जावे लागणार असून
आता पोलीस यंत्रणा तपास करीत आहे तर किमान ज्याना ज्याना एसआयटीने बोलवले त्यानी जायला हवे अन्यथा ज्याना कोणाला काही अनुभव कथन करायचा असेल त्यानी जबाब नोंदवणे गरजेचे आहे
अशोक खरात वर छत्री धरणाऱ्या व त्याचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या रुपाली चाकणकर याना या अशोक खरात याला भेटायला जाताना महिला नव्हत्या का त्या वेळेस त्याचा प्रवास वेळ जात नव्हता का असे एक ना अनेक प्रश्न लोक बोलतात रुपाली चाकणकर याचे पद गेल्या मुळे इतक्या लवकर त्याच्या प्रवासाचा खोळबा झाला की अशोक खरात जेल मध्ये सडत असल्याने खेळखंडोबा झाला
सरकारकडून अशोक खरात याच्या व महिलांच्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल करणारेवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून तसे काही गुन्हे दाखल देखील झाले असले तरी दररोज एक नवीन व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात अशोक खरात जोरात आहे
अंकशास्त्रातून अंगशास्त्रात घुसलेला अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुढ होत आहे तसा गुड तपास देखील एसआयटी करीत असुन हा तपास देखील एका महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे त्या देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत व शिर्डी पोलीस ठाण्यात एका महिलेने व्हिडिओ क्लिप्स तक्रार दिली होती तेव्हा अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात याचे कथीत भक्त देखील आहेत व त्यातील एका ने सोन्याच्या खरया आगठ्या घेवून बनावट खडे व अंगठ्या दिल्याची तक्रार केली आहे अशोक खरात याने विकलेले खडे, व देत असलेल्या वस्तु याचा सखोल तपास एसआयटी करीत आहे
औषधात काय होतं?
या प्रकरणातील सर्वात मोठे रहस्य म्हणजे खरात महिलांना दिलेल्या त्या खारट द्रवात आणि पेढ्यांमध्ये नेमके कोणते रसायन किंवा घटक मिसळले होते? हे द्रव आणि पेढे कोणत्या प्रकारची गुंगी आणत होते? याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात सांगितले की, अशोक खरात तपास यंत्रणेला याबाबत कोणतीही मदत करत नाही. या गूढ औषधांबद्दल तो काहीच सांगत नसल्याने, एसआयटीने त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली आहे. एसआयटी आता या ‘विषारी’ पेढ्यांचा आणि संशयित द्रव पदार्थाचा खरा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांत या गूढ औषधांचे रहस्य उलगडते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
तसेच खरातचे मधाचे बोट कोणी कोणी चाटले यांची देखील चर्चा जोरात असून व्हयग्रा मार्गे चिंचोके तपास होत असून अध्दश्रध्दा वाढीस भर घातली
Comments
Post a Comment