राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकीत अद्याप सन्नाटा

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अद्याप ‘सन्नाटा’  राजकीय समीकरणांबाबत अनिश्चितता कायम
घाडगे न्यूज | प्रतिनिधी
राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असतानाही निवडणूक कार्यालयात अद्यापही शांतता पाहायला मिळत आहे. संभाव्य उमेदवारांची नावे, पक्षीय हालचाली आणि लढतीचे स्वरूप याबाबत कोणतेही ठोस चित्र समोर आलेले नाही. त्यामुळे या पोटनिवडणुकीत नेमकी कशी चुरस रंगणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपाकडून उमेदवार निश्चित होणार, हे जवळपास स्पष्ट मानले जात आहे. मात्र महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्याने 
राष्ट्रवादी लढली नाही तर काॅगेस ने या जागेवर दावा केला असून 
 काँग्रेस कडे देखील जाणवत उमेदवार ‘आयात’ करण्याची वेळ येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षानेही भूमिका स्पष्ट करत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जर ही जागा लढवणार नसेल, तर आपण उमेदवार उभा करू, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीतही अंतर्गत राजकीय समीकरणे आणि चर्चांना वेग आला आहे.
दुसरीकडे, सत्ताधारी आघाडीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अंतर्गत ‘शीतयुद्ध’ सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारीच्या वाटपात तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जवळ येत असतानाही राजकीय वातावरणात अपेक्षित हालचाली दिसत नसल्याने ‘सन्नाटा’ कायम आहे. परिणामी, ही निवडणूक चुरशीची होणार की बिनविरोध पार पडणार, याबाबतही विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर