राहुरी विधानसंभा पोटनिवडणूक साठी इव्हीएम सरमिसळ पुर्ण

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ईव्हीएम सरमिसळ पूर्ण
राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची प्रथम सरमिसळ प्रक्रिया सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा टप्पा पूर्ण करण्यात आला.

प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झालेल्या मशीनचे प्रत्यक्ष वाटप करण्यासाठी ही सरमिसळ केली जाते. भारत निवडणूक आयोगाच्या प्रणालीद्वारे विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली. यानंतर राहुरी मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या मशीनच्या याद्या जिल्हा मुख्यालयात सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना दिल्या जातील. 

निवडणुकीच्या कामकाजासाठी या मशीन राहुरी मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केल्या जातील. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या सर्व मशीन राहुरी येथील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर सर्व संबंधित उमेदवारांनाही या सरमिसळ झालेल्या मशीनची यादी दिली जाईल.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर