देवळाली प्रवरात भिक मागो आंदोलन;नगराध्यक्ष व मुख्याधिकारी मनमानीला विरोध

देवळाली प्रवरात  'भिक मागो' आंदोलन; सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर विरोधकांची टीका
घाडगे न्यूज: प्रतिनिधी
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या कथित हुकूमशाही कारभारा विरोधात तसेच शहरातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक दासू पठारे यांनी १८ जुलै (शनिवार) रोजी शहरात 'भिक मागो' आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या आंदोलनातून जमा होणारी रक्कम प्रतीकात्मक स्वरूपात नगरपालिकेला देण्यात येणार असल्याचे त्यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी नगरसेविका सुनीता थोरात, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चोळके, वैभव गिरमे, ॲड. कुमार भिंगारे, नाना उंडे आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना दासू पठारे यांनी नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि मुख्याधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांवर प्रखर टिका केली लोक पंढरपुर दिड्या साठी पाणपोई उघडतात मात्र आमची पालिका टॅकरने पाणी देवू शकत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे 
विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांना निधी नसल्याचे कारण देऊन टाळाटाळ केली जाते, मात्र सत्ताधारी गटाशी संबंधित भागातील रस्ते आणि विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
"संपूर्ण देवळाली हेच तुमचे कुटुंब आहे. केवळ स्वतःच्या परिसराचा विकास करून चालणार नाही. शहरातील प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळाला पाहिजे," असे पठारे म्हणाले. नागरीक कर रुपाने आपल्या त्याच्या घामाचे पैसे देतात त्याचा उपयोग त्याच्या नागरी सुविधा साठी करा तुमचे ठेकेदार पोसण्या साठी नाही 
वृक्षारोपणासाठी खर्च झालेल्या निधीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "वृक्षारोपणावर झालेला खर्च प्रत्यक्षात दिसत नाही. कागदोपत्री खर्च दाखविण्यात आला असून, त्याची चौकशी व्हावी," अशी मागणी त्यांनी केली.
नगराध्यक्षांवर टीका करताना ते म्हणाले, "निवडणुकीवेळी केंद्र आणि राज्यात आमची सत्ता असल्याने शहराचा सर्वांगीण विकास करू, अशी आश्वासने देण्यात आली. मात्र आज शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार सुरू असून तो आम्ही सहन करणार नाही."
नगरसेविका सुनीता थोरात यांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. "नगरपालिकेच्या पहिल्याच बैठकीपासून विरोधी सदस्यांना आसनव्यवस्थेसह अनेक बाबींमध्ये दुय्यम वागणूक दिली जाते. नागरिकांनी आम्हाला प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी निवडून दिले आहे. दलित वस्ती सुधार योजनेचा निधी त्याच उद्देशासाठी खर्च झाला पाहिजे," असे त्या म्हणाल्या.
शहरातील वाढीव पाणीपट्टीबाबतही त्यांनी आक्षेप घेतला. "पाणीपुरवठा समाधानकारक नसताना पाणीपट्टी वाढविण्यात आली. या वाढीला आम्ही सभागृहात विरोध केला होता. प्रशासकीय काळात निर्णय झाला, असे सांगून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे," असा आरोप त्यांनी केला.
नगरसेवक संतोष चोळके म्हणाले, "चांगल्या विकासकामांना आमचा विरोध नाही; मात्र नगराध्यक्षांच्या एकतर्फी आणि हुकूमशाही कारभाराला आमचा विरोध आहे. सांडपाणी व स्वच्छतागृह योजनांमध्ये अनियमितता झाल्याची शंका असून त्याची चौकशी झाली पाहिजे. मुळा धरण पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन वारंवार फुटत आहे. मुख्याधिकारी केवळ नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार काम करीत असल्याचा नागरिकांमध्ये समज निर्माण झाला आहे. प्रशासनाने सर्व लोकप्रतिनिधींना समान वागणूक द्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल."
या पत्रकार परिषदेत विरोधी नगरसेवकांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, विकासकामे आणि निधीच्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत नगरपालिकेच्या कारभाराची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. तसेच १८ जुलै रोजी होणाऱ्या 'भिक मागो' आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन