महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी संपादक अनिल कोळसे
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई पत्रकार संघटनेच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्ष (अहिल्यानगर) या महत्त्वपूर्ण पदावर संपादक अनिल कोळसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी नियुक्ती जाहीर केली.
पत्रकारिता क्षेत्रात गेली अनिल कोळसे २० ते २२ वर्षे कार्यरत असलेले अनिल कोळसे यांनी
विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन करत पत्रकारितेची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. पत्रकारितेत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सामाजिक कार्यातही अनिल कोळसे यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, पत्रकारांच्या विविध समस्यांवर त्यांनी अनेक ठिकाणी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने त्यांच्यावर अहिल्यानगर जिल्ह्याची धुरा सोपवली आहे.
Comments
Post a Comment