तनपुरेची गुगली बदलतील राजकीय समीकरणे

 तनपुरेंची ‘गुगली’ बदलतील राजकीय समीकरणे
तंरग घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे 
राहुरी मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे संपूर्ण राजकीय समीकरण ढवळून निघाले आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पुत्र अक्षय कर्डिले यांच्या बाजूने निर्माण झालेली सहानुभूतीची लाट ही भाजपसाठी मोठी राजकीय ताकद मानली जात होती. मात्र प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेने या सहानुभूतीच्या लाटेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पोटनिवडणुकीपूर्वीच आपल्या नावाची चर्चा मतदारांमध्ये निर्माण करत तनपुरे यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली आहे. त्यांनी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तरी त्यांच्या हालचालींमुळे राजकीय वातावरणात उत्सुकता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे राहुरीतील राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळतील, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत.
यापूर्वीच्या निवडणुकीत दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तत्कालीन आमदार प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला होता. त्या नंतर मात्र प्राजक्त तनपुरे यांनीही भगवा पट्टा परिधान करत काही कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या सोबत शिवसेनेचे सागर बेग यांची उपस्थितीही पहायला मिळाली  होती. या हालचालींमुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत तेव्हाही चर्चांना उधाण आले होते.
 आगोदर प्राजक्त तनपुरे पहिल्याच नाही नाही म्हणत निवडणुकीत विजयी होत राज्य मंत्रिपदापर्यंत पोहोचले; मात्र ते अवघे अडीच वर्षच मंत्री राहिले. त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले. दुसरीकडे, “मी पुन्हा निवडून आलो तर मंत्री होईन,” अशी हाक देत दिवंगत नेते शिवाजी कर्डिले यांनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला आणि आपल्या खास शैलीत निवडणूक जिंकली. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाली शिवाजी कर्डिले नावाच राजकीय वादळ सपले की जे भल्या भल्याना नडले कधी घाटातील प्रकरणे काढून तर कधी घाटा वरचा म्हणत अनेकांना घाट दाखविला. 
या पार्श्वभूमीवर कर्डिले कुटुंबाबद्दल सहानुभूतीची भावना मतदारांमध्ये दिसून येत असली तरी प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे भाजपसमोरही नवे राजकीय गणित उभे राहू शकते. कारण तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेसह इतर स्थानिक निवडणुकांमध्ये प्रभाव दाखवला असून स्थानिक पातळीवर त्यांचा स्वतंत्र मतदारवर्ग असल्याचे मानले जाते.
दरम्यान, दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रभावी उमेदवार असूनही भाजपला पराभव पत्करावा लागला असल्याने. त्यामुळे राहुरी पोटनिवडणुकीत भाजप कोणतीही जोखीम पत्करण्याच्या मनःस्थितीत नाही. परिणामी, तनपुरे यांच्या हालचाली या केवळ चर्चेपुरत्या मर्यादित राहतात की त्या प्रत्यक्ष राजकीय निर्णयात रूपांतरित होतात, यावरच या पोटनिवडणुकीचे पुढील चित्र मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर