कर्डीले वारशाची राहुरीत परीक्षा

 कर्डीले वारशाची राहुरीत परीक्षा
राजरंग।शिवाजी घाडगे 
दिवंगत आमदार  शिवाजी कर्डीले यांचे सुपुत्र अक्षय कर्डीले हे देखिल लोकशाची परिक्षा देत असुन ही निवडणूक बिनविरोध होण्या साठी भाजपाने प्रयत्न केले मात्र त्याला यश आले नसले तरी भाजपाने ही निवडणूक हलक्यात घेतली नाही हे विशेष आज सायंकाळी सहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारसभा घेत आहेत 
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक ही केवळ एक जागा भरण्याची प्रक्रिया नसून, स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांची आणि नेतृत्वाच्या कसोटीची परीक्षा ठरत आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांनी आपल्या संघर्षमय आणि धडाडीच्या राजकारणातून निर्माण केलेला प्रभाव आजही या मतदारसंघात जाणवतो. मात्र, त्यांच्या पश्चात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे हे सोपे काम नाही. दिवंगत नेते शिवाजी कर्डीले हे सर्व सामान्य जनतेला आपला कामाचा माणूस वाटयचे आपल्याकडे आलेला व्यक्त कोणत्या पक्षाचा पार्टीचा पाहत नव्हते राजकारणात प्रस्थापित घराण्याला त्यांनी शह दिला तसेच आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याना ताकत व बळ दिले जनतेच्या सुखदुखात सहभागी असायचे आता अक्षय कर्डीले यांच्या रूपाने नव्या पिढीचे नेतृत्व समोर आले असले, तरी त्यांच्यासमोर आव्हाने उभी आहेत. वरकरणी ही लढत सोपी वाटत असली, तरी अंतर्गत राजकारण, गटबाजी आणि जुने हिशोब यामुळे ही निवडणूक गुंतागुंतीची  आहे. विशेषतः, ज्यांनी पूर्वी कर्डीले यांना साथ दिली, त्यांच्याच भूमिकेबाबत आज संशय व्यक्त होत असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
राज्यातील सत्ताधारी नेतृत्वाचा पाठिंबा हा निश्चितच मोठा आधार असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन अक्षय कर्डीले यांना लाभत आहे, ही बाब त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. परंतु केवळ वरच्या पातळीवरील पाठबळ पुरेसे नसते; स्थानिक स्तरावरील संघटनात्मक एकजूट आणि कार्यकर्त्यांचा विश्वास अधिक महत्त्वाचा ठरतो.
शिवाजी कर्डीले यांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. अपक्ष म्हणून सुरुवात करून त्यांनी विविध पक्षांतून वाटचाल करत अखेर स्वतःचा प्रभाव निर्माण केला. त्यांच्या यशामागे केवळ राजकीय समीकरणे नव्हती, तर कार्यकर्त्यांशी असलेले नाते आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता होती. हाच वारसा पुढे नेणे हीच खरी कसोटी आहे.
सध्याच्या निवडणुकीत विरोधकांनीही आपली रणनीती आखली आहे. मतदारसंघातील बदलती सामाजिक व राजकीय समीकरणे लक्षात घेता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ताकद लावत आहे. त्यामुळे ही निवडणूक  चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
अशा परिस्थितीत अक्षय कर्डीले यांनी केवळ भावनिक लाटेवर अवलंबून न राहता वास्तवाचे भान ठेवणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे, नाराज घटकांना विश्वासात घेणे आणि मतदारांशी थेट संवाद साधणे हे त्यांच्या यशाचे प्रमुख घटक ठरतील. तर दुसरीकडे भाजपा आपल्या मुळ विचार धारा पासून दुर जाताना दिसतो आज भाजपाचे मंत्री मंडळ पाहीले तर निमे आयात केलेले आहेत नगर जिल्हात देखील तीच  परिस्थिती आहे 
राहुरीची पोटनिवडणूक ही एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण राजकीय वारशाची परीक्षा आहे. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सावध रणनीती, संयमित भूमिका आणि सर्वसमावेशक नेतृत्व हीच खरी गुरुकिल्ली ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर