घाडगे न्यूजने दोन लाखांहून अधिक वाचकांचा टप्पा पार

घाडगे न्यूजने दोन लाखांहून अधिक वाचकांचा पार केला टप्पा 

घाडगे न्यूज या डिजिटल वृत्तमाध्यमाने दोन लाखांहून अधिक वाचकांपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असून
 याचा आम्हाला मनस्वी आनंद आणि समाधान आहे. वाचकांच्या विश्वास, प्रेम आणि पाठिंब्यामुळेच हा प्रवास यशस्वीपणे पुढे सुरू राहुन आमच्या वाचकांना अधिका अधिक कसदार व निष्पक्ष निर्भीड सत्य बातम्या वाचायला मिळतील 
घाडगे न्यूजने सुरुवातीपासूनच सत्य, वस्तुनिष्ठ आणि रोखठोक पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी निर्भीडपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले  आहे. सत्य मांडण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची ताकद व प्रेरणा आम्हाला आमच्या वाचकांच्या पाठिंब्यामुळेच मिळते.
अनेक वाचकांच्या थेट मनापर्यत बातमी पोहचे 
राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांचे जतन करण्यासाठी घाडगे न्यूज कटिबद्ध आहे. तशी आचारसंहिता आम्ही घालून घेतली असून बातमी प्रसिद्ध करताना वाचक हाच केंद्र स्थानी आहे शब्द हेच शस्त्र आणि रत्न 
 तसेच शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नवीन संशोधन आणि उपयुक्त माहिती पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही या माध्यमातून केले जात आहे. विशेषतः चार ही कृषी विद्यापीठात   विकसित होणारे कृषी संशोधन, नव्या तंत्रज्ञानाची माहिती आणि शेतकरी हिताच्या कृषी विभागाच्या योजना 
 विविध योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात आहे.
यासोबतच जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, युवकांना प्रेरणा देणारे उपक्रम, सामाजिक जाणीव निर्माण करणारे विषय आणि सकारात्मक विचारांचा प्रसार करण्यावरही घाडगे न्यूजचा भर राहिला आहे. समाजहिताच्या प्रश्नांवर परखड भूमिका मांडताना कोणत्याही व्यक्ती, समाजघटक किंवा संस्थेला हेतुपुरस्सर दुखावण्याचा आमचा उद्देश कधीही नसेल .आणि 
 सत्य आणि जनहित हेच आमच्या पत्रकारितेचे मूलभूत तत्त्व आहे.
"आमची जात भारतीय, आमचे रक्त लाल आणि आमचा झेंडा तिरंगा" हीच आमची ओळख असून सर्व समाजघटकांना सोबत घेऊन राष्ट्रहिताची भावना जपण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.
दोन लाखांहून अधिक वाचकांच्या विश्वासामुळे मिळालेल्या या यशाबद्दल आम्ही सर्व वाचक, हितचिंतक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. भविष्यातही सत्य, निर्भीड आणि जनहिताची पत्रकारिता करत राहण्याचा आमचा संकल्प असून वाचकांचे असेच प्रेम आणि सहकार्य कायम राहील, असा विश्वास आम्हाला आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन