जिल्हाधिकारी डाॅक्टर पंकज आशिया रुजू

अहिल्यानगर जिल्हाधिकारी म्हणून डॉ.पंकज आशिया हजर 
 
 नगरचे  60 वे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.पंकज आशिया शुक्रवारी पदभार स्निकारला डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असून.  यापुर्वी ते यवतमाळला जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच डॉ. आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
 
डॉ.आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत आर्णी येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

Comments