किर्तनकारांनी धर्माचा प्रसार करावा पक्षाचा नाही -ह .भ .प किरण शिदे

कीर्तनकारांनी धर्माचा प्रचार करावा
पक्षाचा नाही
 सर्वच पक्षात हिंदु आहेत

 ह .भ .प किरण महाराज शिंदे (फडकरी वारकरी )हिंदुराष्ट्र सेना संघटन 9922536303,
वारकरी संप्रदाय हा सर्वाना बरोबर घेऊन चालणार आहे 
 महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. 18 पगड जाती मध्ये संतांनी अवतार घेतले हे सर्वज्ञात व सर्वश्रुत आहे. जगाच्या पाठीवर सर्व मानव जातीला सामावून घेणारा वारकरी संप्रदाय आहे. परमेश्वराचे संपूर्ण ज्ञान त्याचे स्वरूप अगदी सहजपणे सोप्या भाषेत_ जगासमोर संतांनी उभ केल आहे. अनेक जातीपंथातील अध्यात्मिक, परमार्थिक कीर्तनकार रोज आपल्या प्रवचनातून कीर्तनातून अध्यात्मज्ञानाच्या माध्यमातून समाजाला आंतरिक शांतता_ देण्यासाठी नामस्मरणाच्या,भजनाच्या बळावर सदैव पूर्ण वेळ सक्रिय असतात व अशा प्रबोधकांना समाज सर्वतोपरी सहकार्य ही करतो वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा आत्मा आहे. वेदांत सर्व व्यापक वेदोक्त ज्ञान सरळ भाषेत सोपं करून संतांनी कुठलाही भेदभाव न ठेवता मानव जातीला दिला असताना आपला हिंदू धर्म अगदी व्यापकपणे मानव जातीला सांगितला असताना या तत्त्वज्ञानाच्या अनुकरण करणारे वर्तमानातील प्रबोधनकार स्वतःच  अंतरंगात अशांत झाले आहे. तर मग यांनी समाजाला मानसिक शांतता कधी बहाल करावी असा प्रश्न निर्माण होतो.याला सर्वात महत्त्वाचं कारण आहे. महाराष्ट्रातील नासलेले राजकारण राजकारण आणि धर्म यांचे झालेले मिश्रण राजसत्तेवर धर्माचा अंकुश असावा हे निर्विवाद सत्य आहे. मात्र राजसत्ताच पैशाच्या बळावर धर्मावर अंकुश ठेवत असेल तर हे येणाऱ्या काळात त्या धर्माचा अनुकरण करणाऱ्या लोकांसाठी भीषण अशा प्रकारचं भयंकर संकट आहे. प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी भारतीय जनता पार्टीला सहकार्य करणे हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य होतं,राष्ट्रहितासाठी सहकार्य करणे हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य होतं  आहे ते प्रत्येक साधकाने साधू,संतांनी पार पाडलं.मात्र निरंतर त्याच राजकारणाच्या गढूळ डोहात पोहोच राहून आपण आपल्या विषयी समाजात एक वेगळीच नकारात्मकता तयार करून घेत आहोत असे वाटत नाही का? इथे आम्ही प्रभू रामचंद्र यांना काल्पनिक मानणाऱ्या काँग्रेस चे कधीच समर्थक नाही व सदैव पुरोगामीत्वाच्या नावाखाली हिंदूंना डसणाऱ्याचें समर्थक होऊच शकत नाही उगीच भ्रम करून घ्याल असो सर्वच पक्षात आपल्या धार्मिक परंपरेचा आदर करणारे लोक आहेतच कमी असतील परंतु आहेतच सर्वच पक्षात वारकरी आहेतच एखाद्या पक्षाचे समर्थन करत असताना दुसऱ्या पक्षातील एखादा दानशूर वारकरी, हिंदु जर दुखावल्या जात असेल हे पाप ठरत नाही का? किंवा एखाद्या पक्ष रचनेने धर्म आपल्या प्रचाराचा भागच बनवून टाकावा व सर्व धर्म साधकांनी प्रबोधनकारांनी त्यांच्याकडून मिळणाऱ्या मिळकतीच्या बळावर आपले उच्च कोटीचे विचार व ज्या अभ्यासासाठी आपण आयुष्य पण लावला तो अभ्यास संपूर्णतः आत्मघातकी राजकारणाच्या दावणीला बांधावा का? असा प्रश्न निर्माण होतो देशामध्ये तपस्वी साधना केलेलाच राजा असावा, भारतीय प्राचीन मूळ हिंदु संस्कृतीचा आदर असलेला राजा असावा अशी आपली सर्वांची धारणा आहे आणि ती असलीच पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत राहलच पाहिजे राष्ट्रहितासाठी, परंतु राज्य राज्यातील पॉलिटिक्स व छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये प्रबोधनकार कीर्तनकारांनी आक्रमक वक्तव्य करून हिंदू हिंदूंमध्येच गट तयार केले नाहीत का ? असा प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर प्रोफेशनल कीर्तनकार, व्यावसायिक कीर्तनकार, धर्म सांगणारे कीर्तनकार व राऊंडवर धर्माचं काम_ करणारे प्रसंगी शिक्षा भोगणारे कीर्तनकार प्रचंड तपस्या साधना करणारे कीर्तनकार नामस्मरण करणारे कीर्तनकार अनेक वर्ग समाजात आहेत अनेक संत महात्मे आपल्या परंपरा जपण्यामध्ये स्वतःला झोकून देत आहे. हिंदूंच्याच विचाराचे राज्य असावं हिंदूंच्या हिताचे रक्षण करणारे राजे असावे, ही आपली सर्वांची धारणा कायम असणार आहे. त्यासाठी आपण पर्यत्नरत असणार आहोत, मात्र पक्षांतर्गत व इतर पक्षातील हिंदू याचाही आपण विचार करावा असे आम्हास वाटते आहे. शेवटी वारकरी संप्रदायाने संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी निरंतर परमेश्वराची प्रार्थना केली आहे. इतरही धर्माचा आदर केला आहे. हा सांप्रदाय करत राहणार आलेल्या संकटांना उत्तर देण्याची शिकवण सुद्धा संतांनी दिलेली आहे . साम दाम दंडाची शिकवण सुद्धा संतांनी दिली आहे ती आपण अंगीकारली पाहिजे नुसतं सामाजिक जीवनामध्ये कीर्तन करत असताना राजकारण डोक्यात ठेवून कीर्तन करू नये अशा प्रकारचा एक मतप्रवाह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहे.व त्यामुळेच कि काय_ चालू कीर्तनात व्यतंय  आणणे कीर्तनकार यांना रोखने असे प्रकार सुरु झाले कि काय असा प्रश्न निर्माण हो आहे ?

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन