देवळाली प्रवरात भाजपाचे कमळ पुन्हा सत्येची जित !

देवळाली प्रवरात दुसऱ्यांदा कमळाची कमाल
भाजपाचा सत्ता विजय; सत्यजित कदम पुन्हा नगराध्यक्ष
देवळाली प्रवरा | घाडगे न्यूज
 @ शिवाजी घाडगे
देवळाली प्रवरा नगरपालिकेत भाजपाने पुन्हा एकदा आपली निष्ठा सिद्ध केली आहे. मतदारांनी कदम कुटुंबाच्या भाजप निष्ठेला साथ देत काँग्रेसच्या ‘हाताला’ नकार दिला आहे. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत सत्तेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यानंतर देवळालीकरांना एक विश्वासार्ह व आश्वासक नेतृत्व मिळाल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत भाजपाच्या ‘कमळा’ला . नगराध्यक्ष पदा करीता 
सत्यजित कदम यांना १० हजार ४१४ मते मिळाली असून त्यांनी विरोधी उमेदवाराचा ५ हजार ६९० मतांनी पराभव केला, हे विशेष उल्लेखनीय ठरते. भाजपाच्या नगरसेवकाच्या 15 जागा आल्या असून काॅगेस 4 वंचित 1,शिवसेना 1 असे 6 विरोधी नगरसेवक निवडून दिले आहेत. 
केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर सत्ता असतानाही वेळप्रसंगी कोणतीही तमा न बाळगता मदतीला धावून येणारा नेता म्हणून मतदारांनी सत्यजित कदम यांना पुन्हा नगराध्यक्षपदाची संधी दिली आहे. निवडणुकीपूर्वी त्यांच्यापासून सहा नगरसेवक दूर गेले असतानाही नव्या चेहऱ्यांना सोबत घेत त्यांनी निवडणुकीला सामोरे जात विजय मिळवला.
काँग्रेसचे उमेदवार कृष्णा मुसमाडे यांना ४ हजार ७२४ मते मिळाली. काँग्रेस उमेदवार मिळालेली मते व नगराध्यक्ष याना मिळालेल्या मतात तफावत आहे 
मते कमी मिळाल्याने वैयक्तिक यंत्रणा उभी करण्यात ते अपयशी ठरल्याचे चित्र दिसून आले.
नगराध्यक्षपद भाजपाकडे असले तरी विरोधी बाकांवर मजबूत नगरसेवक निवडून आले आहेत. बहुजन वंचित आघाडीचे सुभाष चोळके, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या पत्नी सुनिता थोरात (दुसऱ्यांदा), प्रहार संघटनेचे अप्पासाहेब ढुस यांच्या सून पल्लवी ढुस , काँग्रेसचे शरद वाळुज व तुकाराम (दासू) पठारे तसेच शिवसेना शिंदे गटाचे अशोक चव्हाण असे एकूण ६ विरोधी नगरसेवक देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विरोधी बाकांवर बसणार आहेत.
आता सत्ता फार एक हाती असली तरी विरोधात देखील भक्कम आहेत 
‘डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर’ ठेवत कामकाज करावे लागणार आहे, हे सत्ताधाऱ्यांना लक्षात ठेवावे लागेल.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर