प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध आमदारकीला सहीची आडकाठी?

प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोधला सहीची आडकाठी?
राजरंग।शिवाजी घाडगे 
नामनिर्देशनपत्र माघारी प्रक्रियेत निर्माण झालेल्या तांत्रिक पेचामुळे विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली ।
अहिल्यानगर  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात अनपेक्षित घडामोडी घडल्याने राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीचे उमेदवार तथा माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाली असतानाच नामनिर्देशनपत्र माघारी प्रक्रियेदरम्यान सहीच्या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे.
या निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी तीन उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या नामनिर्देशनपत्र माघारीबाबत आवश्यक असलेल्या सहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे.
पानसरे यांचा अर्ज वैध राहणार की माघारी मान्य होणार, याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न निकाली निघाल्यानंतरच प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित होणार की निवडणूक प्रत्यक्ष मतदानाद्वारे होणार, हे स्पष्ट होईल.
दरम्यान, तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असतानाच सहीच्या तांत्रिक मुद्द्यामुळे निवडणुकीच्या समीकरणांना अचानक कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहचली आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार