लोणीत ग्रंथोत्सव २०२५' चे आयोजन प्रतिनिधी।लोणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व सिंधुताई एकनाथराव विखे पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने 'अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५' चे आयोजन खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृह, पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, प्रवरानगर, ता. राहाता येथे शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ व रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अहिल्यानगर यांनी दिली आहे. 'अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५' चा उद्घाटन समारंभ विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार शिवाजी गर्जे, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार अमोल खताळ, आमद...