नसिफा अब्दुल सत्तार यांचे निधन
सिल्लोडच्या माजी नगराध्यक्षा तथा सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम पत्न
होत . त्यांच्या निधनाने सिल्लोड शहरासह राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
नसिफा सत्तार केवळ आमदारांच्या पत्नी म्हणूनच नव्हे, तर सिल्लोडच्या राजकारणातील एक सक्रिय व प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा म्हणून त्यांनी शहराच्या विकासासाठी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामांना चालना मिळाली होती.
त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे मृत्यूमागील कारणांविषयी स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या अचानक घडलेल्या घटनेमुळे सत्तार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला आहे.
उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सिल्लोड शहराने एक प्रभावी नेतृत्व गमावले आहे.
Comments
Post a Comment