देवळाली प्रवरा नगरपालिका पाणी दर वाढ कमी करा-नगरसेविका थोरात

देवळाली प्रवरा नगरपरिषद कार्यावर पाणी पट्टी दर वाढ रद्द करा 
-नगरसेविका सुनिता थोरात 
प्रतिनिधी।देवळाली प्रवरा
देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या विद्यमान नगरसेविका सुनिता सुरेंद्र थोरात आदोलनाचा इशारा दिला आहे वाढीव पाणी पट्टी रद्द करावी 
देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्टी १,८००/- रुपयांवरून थेट ३,०००/- रुपये इतकी वाढ करण्याचा बेकायदेशीर, अन्यायकारक व जनता  विरोधी निर्णय तात्काळ रद्द करण्या यावा 
देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेला पाणीपट्टी दर १,८००/- रुपयांवरून ३,०००/- रुपये करण्याचा निर्णय हा सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी लक्षात न घेता, लोकशाही मूल्यांना तिलांजली देत व जनतेवर जबर आर्थिक बोजा टाकणारा असून, तो पूर्णतः अन्यायकारक, अव्यवहार्य व निषेधार्ह आहे.
नगर परिषद हद्दीतील नागरिक आधीच महागाई, बेरोजगारी, वीजदरवाढ व विविध करभारामुळे त्रस्त असताना, पाणीपुरवठा हा मूलभूत हक्क असताना त्यावर अशी अमर्याद दरवाढ करणे म्हणजे नागरिकांच्या संयमाची जाणीवपूर्वक परीक्षा घेण्याचा प्रकार आहे. या बाबत नगरसेविका सुनीता सुरेंद्र थोरात आणि निवेदन दिले आहे.
नगर पालिकेने ही अन्याय कारक दर वाढ रद्द करावी 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन