लोणीत ग्रंथोत्सव 2025 आयोजन

लोणीत ग्रंथोत्सव २०२५' चे आयोजन
प्रतिनिधी।लोणी 
​ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व सिंधुताई एकनाथराव विखे पाटील  यांच्या संयुक्त विद्यमाने 'अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५' चे आयोजन  खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृह, पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, प्रवरानगर, ता. राहाता येथे शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ व रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अहिल्यानगर यांनी दिली आहे.

​'अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५' चा उद्घाटन समारंभ विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते  २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न होणार आहे.

​या कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार शिवाजी गर्जे, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार अमोल खताळ, आमदार हेमंत ओगले, आमदार विठ्ठल लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या डॉ. सुस्मिता विखे पाटील, प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहायक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

​या प्रसंगी ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच साहित्यिकांचा आणि उत्कृष्ट ग्रंथ वाचकांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण आणि RRRLF पोर्टलवर १०० टक्के ग्रंथालयांची ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या तालुका ग्रंथालयांना प्रशस्तीपत्र वितरण संपन्न होणार आहे.

​या ग्रंथोत्सवानिमित्त शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथदिंडीचा शुभारंभ माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व लोणी बु. च्या सरपंच श्रीमती कल्पना मैड, पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, प्रवरानगरचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप दिघे, उपप्राचार्य सौ. छाया गलांडे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सुनील गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मारक, बस स्थानकाजवळ, लोणी बु., ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे.

​उद्घाटन कार्यक्रमानंतर तसेच रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी परिसंवाद, व्याख्याने आणि निमंत्रित कवींचे कविसंमेलनही आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन