देशी गाय सुधार प्रकल्पाला पुरस्कार

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा पुरस्कार
राहुरी । 
परळी वैजनाथ येथे आयोजित  महा पशुधन एक्सपो या प्रदर्शनात  कृषी महाविद्यालय पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने शुद्ध देशी गोवंश सन्मान  पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.  महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने देशी गोवंश जतन, संवर्धन, संशोधन, प्रशिक्षण व शेतकरी मार्गदर्शन या क्षेत्रात सातत्याने केलेल्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सुनील सूर्यवंशी व  नेरकर हे गोसेवा आयोगाचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. 

      देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व सह-शास्त्रज्ञ डॉ. सुजित भालेराव यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराबद्दल  महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संचालक, विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संचालक, संशोधन डॉ. प्रशांत बोडके, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने .

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन