माणुसकीची भिंत
माणुसकीची भिंत या उपक्रम
प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका सल्लागार सलीम शेख यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजीत दिव्यांग मार्गदर्शन मेळावा व माणुसकीचे भिंत या उपक्रमाचे उद्घाटन तसेच 26 दिव्यांग बांधवांना अंतोदय रेशन कार्ड वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हाध्यक्ष अँड.
लक्ष्मण पोकळे होते.
प्रास्ताविक उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले जिल्हा समन्वयक निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांनी केले.
देवळाली प्रवरा येथे श्री स्वामी समर्थ बाबुराव पाटील महाराज संस्कृतिक भवन येथे दिव्यांग मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरामधे देवळाली प्रवरा येथील दिव्यांगाना 26 अंत्योदय रेशन कार्ड चे वाटप,व मानुसकिची भिंत उपक्रमाचा शुभारंभ देवळाली प्रवरा नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी नगरसेवक अजित चव्हाण मुख्याधिकारी अजित निकत, ह.भ.प बाळकृष्ण खांदे, ह.भ.प नानासाहेब शिंदे, ह.भ.प.जालिंदर साळुंके, जिल्हा सचिव हमीद शेख ,प्रहार श्रमिक संघटनेचे बाळासाहेब कराळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रास्ताविकात मधुकर घाडगे म्हणाले की दिव्यांग शक्ति सेवा संस्थेच्या अंतर्गत माणुसकीची भिंत हा उपक्रम दिव्यांगासाठी खूप छान उपक्रम आहे यामध्ये आपल्याकडील असणारे दिव्यांगाचे साहित्य उदा. कॅलिबर कुबडी तीन चाकी सायकल व्हीलचेअर वाकर. कानाची मशीन आपल्याकडे असेल ते आम्हाला द्या आम्ही ज्या गरजूवंत दिव्यांग आहे त्यांना मोफत देण्यात येईल असा नवीन उपक्रम सुरू करण्यात आले तालुक्यात जास्तीत जास्त दिव्यांगाचे स्वयंसहायता बचत गट स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले. मुख्याधिकारी अजित निकत यांनी आपल्या भाषणात म्हणाले की दिव्यांगांना कोणतीही अडचण असू द्या आमचे सहकार्य हमेशा राहील दिव्यांग भवानाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. यावेळी सलीम शेख यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला
कार्यक्रमास नगर शहरअध्यक्ष संदेश रपाडीया, नगर तालुकाध्यक्ष किशोर सूर्यवंशी संजय पुंड श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सचिन शिरसागर आदी उपस्थित होते.
कार्याक्रमाचे आयोजक राहुरी ता.सल्लागार तथा देवळाली प्रवरा शहरअध्यक्ष सलीम शेख
समवेत राहुरी ता.अध्यक्ष योगेश लबडे, तालुका उपअध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका महीला अध्यक्षा छाया हारदे,राहुरी शहरअध्यक्ष हरेल , तालुका सचिव दत्तात्रय खेमनर ,तालुका संघटक भास्कर दरंदरे, तालुका संघटक,तालुका संघटक आनिल मोरे देवळाली प्रवरा शहरउध्यक्ष राजेंद्र सोनवने, सुखदेव कीर्तने संदिप बोरसे,ब्रम्हणी शाखाध्यक्ष बाबुराव शिंदेसर,गोटुंबा आखाडा शाखाध्यक्ष आदिनाथ दवणे दवने , टाकळीमीया शाखाध्यक्ष सुरेश दाणवे, शाखा सचिव बाबासाहेब मुसळे, माहेगाव शाखाध्यक्ष भरत आढाव ,वाबोरी शाखाध्यक्ष शशिकांत कुऱ्हे सोमनाथ काळे विष्णू ठोसर आदि उपस्थित होते
Comments
Post a Comment