अवकाळी पाऊसाने नुकसान भरपाई शिवसेना शिष्टमंडळ प्रांताना भेटले

अवकाळी
अवकाळी पाऊसाने झालेल्या नुसकानीचे पंचनामे न झाल्याने देवळाली मंडळातील शेतकरी नुकसान भरपाई पासुनवंचीत.
नुकसान भरपाई मिळावी म्हणुन शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिष्टमंडळाने घेतली श्रीरामपुर प्रांताधिकाऱ्यांना भेटले 
          देवळाली प्रवरासह ३२ गावांत गेल्या वर्षी सततचा पाऊस न् अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले.त्याची भरपाई अद्याप मिळाली नाही.तोच या वर्षी अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले.गेल्यावर्षीची नुकसान भरपाई देवुन या वर्षीच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे म्हणुन शिवसेना(उध्दव  बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिष्टमंडळाने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे नेतृत्वाखाली श्रीरामपुर प्रांताधिकारी श्री किरण सावंत यांना भेटुन मागण्याचे निवेदन दिले. 
      गेल्या वर्षी देवळाली मंडळ व ३२ गावांत सततचा पाऊस झाला.त्याचे पंचनामे प्रशासनाने केले.त्याचा नुकसान भरपाईचा अहवाल शासनांस दिला.ती भरपाई मिळण्याचा निर्णय झाला नाही तोच पुन्हा अतिवृष्टी झाली.तिचे पंचनामे करण्याचे आदेश आले.परंतु यापुर्वीच सततच्या पावसात झालेले नुकसानीचे क्षेत्र असल्याने पंचनामे न करता आहे त्या सततच्या पावसाचे नुकसानीच्या पुर्वीच्याच पंचनाम्यावर नुकसान भरपाई देण्याचे तहसील कार्यालयाने कळविले असल्याचे समजते. 
      ज्या भागात अतिवृष्टीने नुकसान झाले असे पंचनामे झाले क्षेत्र ,तेथे नुकसान भरपाई देण्यात आली ,परंतु देवळाली मंडळ न् ३२ गावांत सततचा पाऊस न्  अतिवृष्टी होवुनहि केवळ अतिवृष्टीचे पंचनामे न केल्याने हजारो शेतकरी या नुकसान भरपाईपासुन वंचीत आहेत.सततच्या पावसाच्या नुकसानीची भरपाई देण्याची शासनाने घोषणा केली असली तरी तसा शासननिर्णय न झाल्याने नुकसान भरपाई मिळणे कठीण बनले आहे. 
      याबाबत माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,शिवसेना नेते अशोक थोरे,अरुण पाटील, दत्ता कडु पाटील तसेच देवळाली शिवसेना शहरप्रमुख अनिल चव्हाण यांचे शिष्टमंडळाने श्रीरामपुर प्रांतांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. त्यावर माहिती घेवुन त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी यांनी दिले. 
      देवळाली न् ३२ गावाची परिस्थिती आई जेवु घालेना न् बाप जेवु देईना अशी झाली आहे.या भागातील लोकप्रतिनिधींनी सजग रहात याबाबत वेळोवेळी आढावा घेत नुकसान भरपाई मिळवुन देण्याचे प्रयत्न करायला हवे होते.परंतु देवळाली न् ३२ गावे सर्वच लोकप्रतिनिधींनी दुर्लक्षीत केले आहेत.याबाबत कार्यवाही न झाल्यास रस्त्यावर येत आंदोलन मोर्चा करण्याचा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे वतीने देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन