देवळाली प्रवरात जनावरांना लाळ्या खुरकुत्या रोगाची लागण
देवळाली परिसरांत झपाट्याने वाढतोय पशुधनावरिल लाळ खुरकुती आजार..शिवसेना ( ठाकरे गट) ग्राहक संरक्षण कक्षाचे दणक्याने प्रशासन सतर्क
देवळाली प्रवरा शहर व आजुबाजुच्या परिसरांत लाळ खुरकुतीचा नवा विषाणु जोमाने पसरला असुन त्यामुळे अनेक गायी न् वासरे मृत्युमुखी पडल्याने शेतकरी हतबल झाला असून दुष्काळात तेरावा अशी परिस्थीती उदभवली आहे.
याबाबत शिवसेना ( ठाकरे गट) ग्राहक संरक्षण कक्षाने आवाज उठविल्याने वरिष्ठ अधिकारी न् विभागीय रोग अन्वेषणची डॉक्टरांचे पथक देवळाली प्रवरा परिसरांत दाखल झाले.
त्यांनी बाधीत जनावरांचे गोठयावर जात जनावरांची प्रत्यक्ष तपासणी केली. काय खबरदारी घ्यायची तसेच काय उपाययोजना करायची याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना ( ठाकरे गट)ग्राहक संरक्षण कक्षाचे अहमदनगर जिल्हा संघटक दत्ता कडुपाटील यांनी याबाबतचे सवीस्तर निवेदन उपायुक्त डॅा तुंभारे यांना दिले.या निवेदनात हि साथ लवकर आटोक्यात आणावी. शासनाकडून ओषधउपचार निःशुल्क व्हावेत.मृत जनावरांची नुकसान भरपाई मिळावी. आदि मागण्या करण्यात आल्या.
देवळाली प्रवरा परिसर नगरपरिषदेत येत असल्याने जि प पशुसंवर्धन विभागाला उपाययोजना करण्यांस मर्यादा येत असल्याने या खात्याअंतर्गत योजनांचा लाभ शेतक-यांना देत नाही.देवळाली प्रवरा पुर्णपणे ग्रामीण भागात असलेली नगरपरिषद आहे.तेव्हा या नगरपरिषद हद्दीत या योजनांचा लाभ मिळणेबाबत मागणी दत्तात्रय कडु यांनी केली.
नगरपरिषदेस तातडीने फवारणी करण्यांस सांगितले असुन या साथीचे आजाराबाबत नगरपरिषद प्रशासनने प्रचार करुन जनतेत जागृती निर्माण करण्याच्या सुचना देण्यात आल्या.याबाबत नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी लोंढे यांनी तातडीने आदेश दिले आहेत.
एकंदरीत हा विषाणु कोणता याचे निदान प्रयोगशाळेत झाल्यावरच उपाययोजना करता येतील.तोपर्यत शेतक-यांनी खबरदारी घ्यावी.अश्या सुचना विभागीय रोग अन्वेषण तज्ञ डॅाक्टरांनी दिल्या आहेत.
या आजाराने सर्वसामान्य शेतक-यांचे कंबरडे मोडले असुन साथ पसरतच आहे.त्यामुळे शासनाने विशेष बाब म्हणुन मृत जनावरांची नुकसान भरपाई देण्याची मागणी उपस्थितीत शेतक-यांनी केली.
यावेळी उपायुक्त पशुसंवर्धन डॅा श्री तुभांरे ,नासीक विभागीय रोग अन्वेषण टीम, शिवसेना (ठाकरे गट) ग्राहक संरक्षण कक्षाचे सहसंघटक दत्ता कडुपाटील,शेतकरी गणेश कडु, कृष्णा ढुस , राजु चव्हाण , प्रभाकर ढुस ,रामदास ढुस उपस्थित होते.
Comments
Post a Comment