अतिक्रमणाची हौस कोणाला !

अतिक्रमणाची हौस कोणाला !
विशेष @पत्रकार शिवाजी घाडगे 
संध्या जिल्हयातील काही तालुक्यात अतिक्रमण विरोधात मोहीम जोरात चालु आहे कदाचित अतिक्रमण असेल तर निघाले पाहीजे मात्र त्यांना पर्यायी जागा सुध्दा दिली पाहीजे. 
हे व्यावसायिक अथवा रहानारे बेघर होणार नाही यांची काळजी देखील प्रशासनाने घ्यायला हवी कदाचित काही अतिक्रमण शासनाने नियमित केले मात्र त्याची तशी नोंद शासन दरबारी नसेल तर दोष कोणाचा. 
बर हे अतिक्रमण झाले याची खबर तुमच्या कार्यालया या आगोदर दिसली नाही का दिसली असेल तर तशी नोटीस बजावली का एक तर तुम्ही लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाहीत व लोक करतात त्यांना रोजगार करु देत नाहीत अथवा तुम्ही घरे देऊ शकत नाहीत अथवा लोकांनी बाधले त्यात राहु देत नाहीत. 
महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना पै पै करून गरिबाने कुडाचे अथवा पत्र्यिचे निवारा केला तो ही तुम्ही जेसीबी काढून टाकला मग त्यांनी राहायचे कुठे शासकीय नापीक अथवा पडीक जागा द्या नाहीतर त्या लोक उद्या तुमच्या कार्यालया समोर बि-हाड माडतील. 
आता निवडणुका संपल्यात लोकांची आपल्याला गरज नाही असा कोता विचार जर तुमचा असेल तर एका जत्रेने देव म्हातारा होत नाही अस म्हणतात देव म्हातारा होत नसला तरी तुम्ही म्हातारपणाकडे वाटचाल करीत आहात हे ध्यानात ठेवा अण प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपण पुढाऱ्यांचे घर गडी नाहीत यांचे भान ठेवा. 
नगर पालिकेच्या मोकळ्या जागेत बगिचा, क्रीडांगणे करा व जमलेत तर विधवा एकल महिलेला व्यावसाया साठी जागा उपलब्ध करून द्या. कचरा गोळा करण्याचा ठेका पाठीवर गोण्या घेऊन भंगार गोळा करणार्या महिलाना देण्याचे धाडस दाखवा 
बेघराना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राहायला आधी घरे बांधा व अतिक्रमण काढलेल्या नागरिकांना तेथे राहीला द्या अंध अथवा दिव्यांग व्यक्तीला हात गाडी तुम्हीच द्या व जागा ही द्या. 
तुम्ही जागा दिल्यावर अथवा जागा असल्यावर कोणाला अतिक्रमण करण्याची हौस येथे कोणाला 
गेल्या अनेक वर्षांपासून नागरीक रस्त्यावर भाजी घेतात कोणी शहरात भाजी मंडई उभारली उलट भाजी मंडई हटवून जागा बिल्डर च्या घशात कोबल्या. 
आहो बाजार करु व्यावसायिक कडुन पावती घेता मात्र त्याच्या साठी साधी मुतारी सुधा तुम्ही बाधु शकला नाहीत तेव्हा तुम्ही काय घरे बांधून देणार म्हणा. 
अतिक्रमण काढले तुम्ही मात्र विचारावर झालेले अतिक्रमण तेवढे काढा म्हणजे झाले 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर