बिबट्याने घेतला शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट

बिबट्या घेतोय शेतकर्‍यांच्या नरडीचा घोट 
प्रशासनाची आजुनही जाईना झोप 
घडल काय @पत्रकार शिवाजी घाडगे 
 वडनेर येथे रात्री पिकाला पाणी भरयला गेलेले शेतकरी शोभाचंद सिताराम गव्हाणे वय 50 याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने जागीच ठार केले  शेतकर्‍यांच्या नरडीचा घोट बिबट्याने घेतला आहे 
जगाचा पोशिंदा व भाग्यविधाता 
म्हणून शेतकर्याला संबोधले जाते 
मात्र यांच भाग्य विधात्याचा पत्नी आज सोमवारी विधवा झाली असून शेतकऱ्याचा नलडीचा घोट बिबट्या घेतोय यांचे कोणालाच सोईर सुतक नाही जंगल नाहीशे झाले अण बिबट्ये कधी मानवी वस्तीत घुसले ते कळेच नाही वन विभाग करत काय हाच खरा प्रश्न आहे शेतीला कुंपण घालण्या साठी अनुदान आहे मात्र ते मोठे लोक घेऊन बसले मग बिच्चाऱ्या गंरीब व वशिला नसलेल्या शेतकऱ्याला मरणा शिवाय काय 
ज्या शेतकऱ्याच्या मेहनतीने अनेकांची भुक क्षमवली जाते तोच शेतकरी तडफडून शेतात मरतो तेव्हा किती भयावहक चित्र आहे दिवसा विज नसते म्हणून शोभाचंद पहाटे शेतीला पाणी देण्या साठी गेले अण दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या नरडीचा घोट घेतला मात्र त्यांच्या किचाळीचा आवाज कुणापर्यत पोहचलाच नाही 
शोभाचंद यांच्या जाण्याने गावावर शोक कळा पसरली होती पत्नीचा आवाज बंद झाला तर दोन मुलीच्या हुंदक्यांनी गाव हळहळला एक पोरगा त्याचे छतच गळुन पडले 
कदाचित शोभाचंद यांच्या मृत्यूनंतर बिबट्या साठी उपाय योजना केल्याही जातील परतु त्या कुचकामी असतील कदाचित कुटूंबाला मदत मिळेल मात्र गेलेला माणूस मिळणार नाही 
अन्नदाता शेतकरी भारत मातेत्या पुत्राचे असे अकस्मात जाणे किती दिवस चालु राहणार हा खरा प्रश्न आहे
झोपलेले प्रशासन कधी जागे होणार हे देवाला ठाऊक 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन