जिल्हात बेमोसमीचे तांडव खडकी व वाळकीचे 25 नागरीक सुरक्षीत जागेवर हलविले

खडकी वाळकी परिसरात पूरपरिस्थिती 25 नागरीक हलवले 
लष्कराच्या मदतीने आपत्ती निवारण कार्य सुरु 

बेमोसमी मुसळधार पावसाने 
अविरत पडणाऱ्या  जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील खडकी  व वाळकी गावामध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाण्याची पातळी कमरेपर्यंत पोहोचली असून, रहिवासी अडकून पडले आहेत. हे गाव सैन्याच्या आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (ACC&S) पासून सुमारे २० किमी अंतरावर आहे. याठिकाणी लष्कराच्यावतीने मदतकार्य राबविण्यात येत आहे. यात खडकी येथून १० व वाळकी येथून १५ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. 

जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती प्राप्त झाल्यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ ACC&S येथून एक मदत पथक तैनात करून बचाव व मदत कार्य सुरू केले.

हमदत पथक सायंकाळी पथक खडकीनगर गावात दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू केले आहे, अशी प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन