कृषी औजार विकासासाठी उपयुक्त- डाॅ शिर्के

कृषि साहित्याचे वाटप हा शेतकर्यांच्या विकासासाठी एक महत्त्वाचा उपक्रम
संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के

शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय असून ग्रामीण जनता शेतीवर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाला सामोरे जाण्यासाठी शेतकर्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंबन करून शेतीची उत्पादकता व उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. शेतकर्यांना कृषि साहित्याचे वाटप करणे हा शेतकर्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा उपक्रम असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या नेतृत्वाखाली व कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा स्मार्ट इरिगेशन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल कदम यांच्या देखरेखीखाली नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद व कृषि अभियांत्रिकी विभाग महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत असलेल्या कन्सोरशिया रिसर्च प्रोजेक्ट, आयओटी सक्षम व सेंसर आधारीत अद्ययावत सिंचन व्यवस्थापन प्रणाली हा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेच्या माध्यमातून कृषि साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन वडझरी खु., ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख तथा प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल कदम,वडझरी खु., गावचे उपसरपंच  पांडुरंग सुपेकर, स्मार्ट इरिगेशन प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक डॉ. प्रमोद पोपळे उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुनिल कदम यांनी  प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देऊन कृषि साहित्य वाटपाचा महत्त्वाचा उद्देश शेतकर्यांना समजावून सांगितला. याप्रसंगी स्मार्ट इरिगेशन प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेच्या माध्यमातून वडझरी खु. गावातील 32 शेतकर्यांना कृषि साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये कृषि अवजारे, जैविक खते, जैविक औषधे व कृषिदर्शनी-2025 या साहित्याचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला  पांडुरंग सुपेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र सुपेकर तर आभार श्री. अशोक भडांगे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी वडझरी खु. गावातील लाभार्थी शेतकरी तसेच स्मार्ट इरिगेशन प्रकल्पातील संशोधन सहयोगी डॉ. शुभांगी घाडगे, वरिष्ठ संशोधन सहकारी इंजि. शुभम सुपेकर आणि इंजि. गणेश खेमनर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर