राहुरीत नाथ प्रतिष्ठान आयोजित दांडिया महोत्सव

राहुरीत नाथ प्रतिष्ठाण च्या पुढाकारातून  भव्य रास दांडिया उस्वोव सुरु झाला असून नवरात्री निमित्त सुरु आहे 
सामाजिक संस्था नाथ प्रतिष्ठानच्या वतीने  रास दांडिया महोत्सव शुक्रवारी २६ सप्टेंबर पासून  सुरू झाला असून, ३० सप्टेंबर पर्यंत  चालणार आहे. 
 महोत्सवात मुलींसाठी सायंकाळी ७ ते ८.३० आणि महिलांसाठी रात्री ८.३० ते ११ या वेळेत गरबा-दांडियाचा उत्सव साजरा करण्यात येतो.
नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक  सौरभ उंडे यांनी शहरातील सर्व महिलांना आणि तरुणींना आवाहन केले की, “ दांडिया महोत्सव सर्वांसाठी खुला असून, प्रत्येक स्त्रीने त्याचा मनमुराद आनंद घ्यावा.”
सध्याच्या नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडिया नृत्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे कार्यक्रम विशिष्ट उच्चभ्रू गटापुरतेच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. याच्या पार्श्वभूमीवर, राहुरीतील सर्व समाजघटकांतील महिलांना एकत्र आणून सामाजिक समता आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा उपक्रम नाथ प्रतिष्ठान गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने राबवत आहे.

या उपक्रमामुळे महिलांमध्ये एकता, आनंद, संस्कृतीचा अभिमान आणि सार्वजनिक सहभाग वाढीस लागला आहे. महिलांनी या महोत्सवात रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख घालून गरबा-दांडियाचा जल्लोष करत सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडवले.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर