साहेब तुमचे आश्रू व्यर्थ जाऊ देणार नाही ! ओ विजु शेट तुम्ही नादच केला थेट
साहेब तुमचे आश्रू व्यर्थ
जाऊ देणार नाही....!
घाडगे न्यूज
स्पेशल रिपोर्ट @शिवाजी घाडगे
डाॅ तनपुरे सहकारी साखर कारखान्याला 1 कोटी रुपयांची ठेव
देवुन विजू शेट सेठी यांनी नादच केला थेट असेच म्हणावे लागेल रविवारी रात्री त्यांनी
कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अरुण तनपुरे यांना एक कोटी रुपये दिले
उद्योजक विजय सेठी हे राहुरी फॅक्टरी येथील रहिवाशी सध्या पुणे स्थित उद्योजक विजय पवनकुमार सेठी मात्र तुमचे आमचे
"विजू" शेट कारखान्यावर आपल्या स्वतःच हेलीकॉप्टर घेऊन ते आले तेव्हा त्यांच्या स्वागताला अख्खी फॅक्टरी गोळा झाली होती आपल्या वर येथील जनतेचे ईतके प्रेम पाहून ते भारावून गेले
कारखाना जिल्हा सहकारी बॅंकेच्या ताब्यात आहे जवळपास 100 कोटी रुपयांवर कर्ज गेले आहे आणि थकित कर्ज वसूल साठी बॅकेने कारवाई केली मुळात हे कर्जा विरोधात कारखाना न्यायालयात गेला होता प्रशासक बसवला न्यायालयात प्रकरण काढून घेतले सरकारी बाबुचे काही गेले नाही गेला तो संभासदाच्या मालकीचा कारखाना प्रगतीला सत्ता दिली मात्र प्रगती साधता आली नाही कारखाना सुरु करण्यासाठी जाहिरात बाजी झाली
पुढे प्रशासक आणि कारख्यान्याला दिवंगत माजी आमदार दादासाहेब तनपुरे यांचे नाव असून हे नाव फक्त अध्यक्ष अरुण तनपुरे वाचवु शकतात या आशेवर राहुरीच्या सभासंदानी त्यांच्या हाती बहुमतानी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची सत्ता दिली अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी राहुरी बाजार समिती उत्तम चालवली, राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाल्यावर राहुरी नगरपालिकेत देखील आपल्या कामाचा ठसा उमटवून जनतेचा विश्वास आपलेसा केला आता सध्या तनपुरे सहकारी साखर कारखाना ताब्यात आला तो कोट्यावधी रुपयांच्या कर्जाच्या बोज्या खाली काही लोकांना तनपुरे कारखान्याची मुळा प्रवरा करायची होती परतु राहुरीच्या सभासंदानी तो डाव हाणून पाडला व पुन्हा आपलेच माणसे कामाचे असतात या भुमिकेतुन दादासाहेब तनपुरे यांचे चिरंजीव अरुण तनपुरे यांच्या हाती सत्तेच्या च्याव्या दिल्या अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्यावर
जनतेचा विश्वास आहेच तसाच विश्वास उदयोजक विजय सेठी यांनी दाखवत आम्ही येथे लहान चे मोठे झालो व हा कारखान्या सुरु झाला पाहीजे असे आपले दिवंगत वडील पवनकुमार सेठी यांची देखील ईच्छा होती व याच ईच्छे खातर अध्यक्ष अरुण तनपुरे यांना आपल्या निवासस्थानी बोलवुन घेत स्नेह सत्कार करत एक कोटी रुपयाचा धनादेश अध्यक्ष तनपुरे यांच्या कडे सुर्पत करत एक आर्दश दाखवून दिला आहे त्यांनी जी मदत केली ती मदत नसून दिशादर्शक दिवा आहे येथे दिवा विझवनारे अनेक असतात मात्र दिवा लावणारे कमी असतात खाजखी व सहकारी साखर कारखान्यातील स्पर्धेत अनेक सहकारी साखर कारखाने कर्जबाजारी पडून अखेरची घटका मोजत आहेत असे असताना विजय सेठी सारखे उद्योजक कारखाना पुन्हा सुरु करण्या साठी मदत करीत आहेत त्याच्या सारखी मदत राहुरीकरानी गट तट राजकारण विसरुन करायला हवी हा कारखाना पुन्हा सुरु झाला तर पुन्हा नव्याने इतिहास निर्माण होईल तनपुरे सहकारी साखर कारखाना संलग्न संस्थानी देखील मदती साठी पुढे यायला हवे कारण आज आपली मातृ संस्था आजारी आहे व तीला बरे करण्या साठी निच्छित पुढे यायला हवे
विजु शेट तुम्ही नादच केला थेट तुमचा आर्दश राहुरीतील नागरिक निच्छित घेतील केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शाह देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने मोठे पॅकेज तनपुरे सहकारी साखर कारखान्याला देतील
अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी कारखाना व्यवस्थापन अतिशय धुरंधर पणे हाताळात आहेत त्या हाताला बळ देण्या साठी आपण सगळेच पुढे येवुया सहकारी साखर कारखान्या मुळे समृद्दी, वैभव आले आहे शिक्षण संस्थे मुळे असंख्य तरुण सुक्षीत झाले आता
पुन्हा गत वैभव निर्माण करण्या साठी सर्वानी एकी दाखवण्याची गरज आहे राहुरी तालुका समृध्द आहे धरण दोन नद्याचे पाणी व 25 कि मी अंतरावर ऊस असा बागायत तालुका आता हुलगे बिलगे पेरुन झाले तेव्हा तालुक्यातील तरुणानो पुन्हा पेटवा हो मशाली म्हणत स्वाभिमान जागृत ठेवून आपला कारखान्याच्या बाॅयलर मधुन धुर काढण्या साठी सज्ज होऊ या कारखान्यावर लक्ष्मी नारायण चे वास्तव आहे ज्यानी ज्यांनी गैर कारभार केला त्याचे वाटोळे झाले आहे
अध्यक्ष अरुण तनपुरे हे एक कोटी रुपयांचा चेक स्विकारताना भावनिक झाले डोळ्यात आनंद आश्रूना वाट मोकळी करून दिली
जेव्हा हा कारखाना ह्या स्थितीतुन पुन्हा सुरु होईल व यांचा इतिहास लिहला जाईल तेव्हा तेव्हा अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या नावा बरोबर विजू शेट यांचे देखील नाव लिहावे लागेल व अजून ही जे मदत करतील ते कारण बोलणी व कथनी एक असावी लागते तेव्हाच म्हणतात बोले तैसे चाले त्यांची वंदावी पावले चला तर मग आपला कारखाना आपल्या माणसांना आर्थिक बळ देवुया तेव्हा अरुण साहेब तुमचे हे आश्रू आम्ही खाली जाऊ देणार नाही !
Comments
Post a Comment