फेटा गळुण पडला ?
घाडगे न्यूज स्पेशल रिपोर्ट
@शिवाजी घाडगे
निवृत्ती इंदुरीकर हे विना अनुदानित शाळेत शिक्षक होते येथे कायम विनाअनुदानित राहणार यांची जाणीव झाल्यावर त्यांनी लगेच शिक्षकी पेक्षा सोडत लोक शिक्षणाचा पेक्षा स्विकारला प्रबोधन सुरु केले
त्यांच्या किर्तनाची टेपरेकॉर्डर वरील कॅसेट आली आणि एका रात्रीत निवृत्ती देशमुख बाबा झाले
त्याची समाज विषयी तळमळ व आवाजाला जनतेने दाद दिली
व लोक त्यांना समाजप्रबोधन कार म्हणुन ते पुढे आले तर किर्तनाला हजारो लोकांची गर्दी होवु लागली ती गर्दी गेली तीस वर्ष कमी झाली नाही व आज ही ते नंबर एकचे प्रबोधनकार आहेत अतिशय सोप्या भाषेत ते किर्तनातुन प्रबोधन करतात असले तरी आज त्यांचे चाहते व काॅलोर्स अगणित आहेत
आपल्या जीवन युट्यूबवर लोक लखोपती झाले म्हणून ते आपल्या कार्यक्रमात कोणाला मोबाईल अथवा शूटींग काढु देत नाहीत शूटींग काढणारानी हळदीला शूटींग काढता काढता पप्पीला पळवल्याचे उदाहरण ते देतात
मुळात महिला विषयी ते स्पष्ट बोलतात हे ठिक आहे मात्र हेतु विषयी काय मुली जिन्स पॅन्ट घालून... कशा करतात
तर लग्न साधी केली तरी मुल होतात तेव्हा ते लग्न म्हणाले साखरपूडा नाही असे म्हणत वेळ मारून नेली जाऊ शकती
कदाचित आगोदर च्या कीर्तनकारांनी या शैलीत कीर्तन केले नव्हते. कॉमेडी कीर्तन हा वाह्यात शब्द त्यांच्यामुळे प्रचलित झाला. महंत नारायण गिरी महाराज तसे बोलून दाखवायचे
महिलांविषयी टिप्पण्या नि:संशय खालच्या दर्जाच्या आणि हीन करु कदाचित नारायणाच्या गादीवर उभे राहून ते बोलत असल्याने त्यांना कोणी जाब विचारण्याचे धाडस केले नाही मात्र अलिकडे त्याच्या कौटुंबिक कार्यक्रम सोशल मीडियावर आला अण युट्यूबर खवळले मग हा कार्यक्रम कसा काय शुट झाला त्यांना त्यांनी का रोखले नाही
व्यसनाविषयी आणि भरकटलेल्या युवाकाना ते हक्काने सुनावतात योग्य होते वर करणी त्यांचा आव आधुनिक कीर्तनाचा असला तरी काही बाबतीत ते मध्ययुगीन मानसिकतेचेच पुरस्कर्ते होते हे स्पष्ट
अलिकडेच त्यांनी त्रागा करत आपण या पुढे कीर्तन करणार नसल्याचे जाहीर केलेय. त्यांनी काय करावे हा त्यांचा वैयक्तिक आहे, कोणी सांगू शकत नाही. मात्र कीर्तन बंद करण्यासाठी त्यांनी जी सबब पुढे केलीय ती पटणारी नाही.
ते म्हणतात की लोकांनी त्यांना घोडे लावलेत तुम्ही देखील इतके दिवस अनेकांना घोडे लावले याचे काय?
तुम्ही ते घोडे मोकळे सोडले म्हणून ते आज लावले असतील.
पोरींनी लग्नात गॉगल घालून नाचू नये, गालांना मेकअप करू नये, डोळ्याखाली भांगेत रंग भरू नये, लिपस्टिक लावू नये, वरात काढू नये आणि काढलीच तर त्यात नाचू नये अशा शंभर गोष्टी चा उपदेश तुम्हीच केलेतना मग आता रडता कशाला
लग्नं साधीच केली पाहिजेत, उधळपट्टी करू नये! कमी माणसं बोलवावीत, लग्नाचा फालतूचा खर्च कमी करून तो पैसा सामाजिक कार्याला दिला पाहिजे, लग्नात बडेजाव करू नये गाड्या अण घोड्यांचे प्रदर्शन करू नये, ही सगळी त्यांची मते! ही मते बरोबर आहे यात दुमत असायचे कारण नाही.
अलिकडेच साखरपुडा दिमाखात आणि थाटामाटात साजरा झाला. त्यांच्या मुलीला सर्व सुखे लाभोत असाच आशीर्वाद साऱ्यांनी दिलाय
मात्र यावेळेस त्यांच्या विसंगतीवर बोट ठेवण्यात समाज मागे राहिला नाही मग इंदुरीकर आपले आहेत म्हणून समाजाने त्यांना सुनावले
त्यांनी ज्या गोष्टींवर टीका केली होती त्या सर्व गोष्टी त्यांच्या या सोहळ्यात साजऱ्या झाल्यात. त्यांची मुलगी गॉगल घालून कारच्या सनरूफमध्ये उभी राहून नाचलीय या नाचण्याला आपला आक्षेप नाहीये, त्यांचा मात्र नक्कीच होता
तिने मेकअप केलाय, त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर तिने नको ती सर्व थेरं केली आहे, मुलींनी काय करावे काय नाही हे सांगण्याचा त्यांचा अधिकार नसूनही त्यांनी हिरेमाणकं उधळावीत तशी ही मुक्ताफळे उधळली होती आणि आता ते कचाट्यात अडकले
इंदुरीकरांनी या विषयी जे सांगितलं होतं त्याच्या नेमकं उलटं त्यांच्या कार्यात घडलेलं दिसतं नवरदेव डुलत आला आणि त्याच्या वरातीत नागीण डॅन्स, मुंगळा डॅन्स हे त्यांचेच शब्द आहेत झाला नाही, लोक झिंगले नाहीत या गोष्टी वगळता बाकी सर्व तसेच झाले! आता यासाठी ते कुणाला दोशी धरणार
ते म्हणतात की वऱ्हाडी मंडळी भारतीय बैठकीत होती, जेवण वाढणारे वाढपी वारकरी वेषभुषेत होते, लग्नाला आलेल्या महिला मराठी साज नेसून होत्या बाल टाळकरी नाचविले असे कोणी म्हणार नाही कारण तो त्या बालकांचा अपमान आहे.
भपकेबाजीवर टीका केली होती ती त्यांना टाळता आली नाही! नाचणाऱ्या स्त्रियांवर टीका केली होती ते टाळता आले नाही!
तुम्ही खुर्चीवर बसला की जमिनीवर बसला याला महत्व नाही तुम्ही जे सांगत आला होतात त्याचे तुम्हीच पालन केले का हे महत्वाचे आहे.
या विषयावर अतिशय प्रतिकूल मत मांडत सामान्य लोकांवर त्यांनी नेहमीच तोंडसुख घेतलेय, सबब जे स्वतःला प्रबोधनकार म्हणवून घेतात त्यांनी ज्या गोष्टीवर कडाडून टीका केलीय, तिच गोष्ट त्यांनी केली असेल तर ती नैतिक बरोबर कशी
समजा त्यांनी अशा प्रकारची टीका त्यांच्या कीर्तनाद्वारे केली नसती, तर त्यांनी हा कार्यक्रम कसाही केला असता, तर त्यावर टिप्पणी करण्याचा अधिकार केवळ त्या लोकांना उरला असता, जे अशा प्रकारच्या सोहळ्यांना फाटा देऊन आदर्श पद्धतीने लग्न साखरपुडा आदी कार्यक्रम करतात.
इथे इंदुरीकर नैतिकदृष्ट्या चुकले
आता लोकांनी त्यांना आरसा दाखवल्यावर त्यांनी त्रागा करू नये
आपण चुकलो हे प्रांजळपणे मान्य करण्याची उदारता त्यांच्या ठायी नसेल आणि त्यांना बोल लावणाऱ्यांवरच ते नाराज असतील तर त्यांनी कठोर आत्मपरीक्षण केले पाहिजे.
लोकांना उपदेश करणं सोपं असत पण आपल्याकडूनही त्यांचं पालन व्हावे हे उपदेशकर्त्यास उमजत नसेल तर तो उपदेश तोंडाची वाफ ठरतात इंदुरीकर चुकलेतच!
मुखी सांगे ब्रह्मज्ञान। जन लोकांची कापितो मान ।।
कथा सांगतो देवाचि । अंतरी आशा बहु लोभाची ।।
तुका म्हणे तोचि वेडा । त्याचे हानोनि थोबाड फोडा ।।
'घोडे लावलेत' ही भाषा कीर्तनकारांच्या मुखी शोभत नाही! कारण संत परंपरेतील अनेक ज्ञानी, व्यासंगी, संयमी, वैराग्यशील आणि अध्यात्मिक उंची गाठलेल्या अनेक विख्यात मंडळींची नावे कीर्तनकार या शब्दाशी जोडली गेलीत.
इंदुरीकरांनी जो त्रागा चालवला आहे, जी आदळआपट केलीय आणि जी भाषा वापरली आहे त्यासाठी तुकोबांचा एक अभंग उद्धृत करावासा वाटतो -
रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याच गुणॆं जगी वाया गेला l
इंदुरीकर तुम्ही लोकांच्या मुलीच्या कपड्यावर बोललात म्हणून लोकानी तुम्हाला आठवन करुन दिली तुम्ही किर्तनात शिवाजी महाराज नाव घेता मात्र शिवाजी महाराज चे महिला विषयी धोरण चांगले होते अनेक महिलांनी बिकट परिस्थितीवर मात करत आपल्या कुटुंबाला पुढे नेले आहे कदाचित तुमच्या घरात देखील तुम्ही किर्तना साठी बाहेर असताना तुमच्या पत्नीने कुटुंबाकडे मुलांकडे चांगले संस्कार दिले
तुम्ही किर्तन बंद करु नका थोडासा महिलांवरचा राग कमी करा
तुम्ही किर्तन बंद केले तर परप्रांतीय लोक येथे येतील तुम्ही किर्तनाती अमिताभ आहात
इंदुरीकर तुमच एक बर आहे तुम्ही पाकीटा साठी अडुन बसत नाही जे दिले त्यात समाधान तेव्हा आता तुम्ही फेटा ठेवु नका तुम्ही चुकलात व चूक मान्य करा कारण तुम्ही वारकरी संप्रदायातील आहात व हा संप्रदायातील मोठ्या मनान चुक पोटात घेतील मात्र
शेवटी बोले तैसे चाले त्यांची वदांवी....
एकदम छान व मार्मिक लिखाण.
ReplyDelete