नगराध्यक्ष पदा साठी घराणे शाहीचे वारसदार : कुटुंब कल्याणम
नगराध्यक्षांच्या खुर्चीवर घराणेशाहीचे वारसदार !
घाडगे न्यूज चर्चा @ शिवाजी घाडगे
नगराध्यक्ष पदाला मिनी आमदार नाव देऊन आपण नेत्यांना खुश केले आता मात्र नेतेचे आपल्या कुटुंबातील व्यक्तीना उमेदवारी देऊन
नगराध्यक्ष पदांवर घराणे शाहीचे वारसदार पुढे आणले गेले
ही राजकीय सकल्पना माझे कुटुंब माझा विकास शहर सुंदर ऐवजी माझे कुटुंब सुंदर व सक्षमता
आमलात आणली स्वाभिमानी प्रामाणिक व्यक्तीना उमेदवारी दिली जात नाही तेथे पाहीजे...... गोचिड यांची चिड येत असली तरी दाता खाली जिभ दाबुन धरल्या शिवाय पर्याय नाही
सध्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे उमेदवारी नामनिर्देशनपत्र छाननी नंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे कोण
कोणात लढत होणार हे निश्चित झाले कोठे राजकीय पक्ष तर कोठे स्थानिक विकास आघाड्या यांची
गणिते आखली जाऊ लागली, एकंदरीत पहाता या निवडणुकीत खरं तर माझे शहर माझी जबाबदारी असे राहीले नाही" माझे शहर माझी जहागिरदारी " असे चित्र सगळीकडेच पहावयास मिळत आहे
सगळीकडेच घराणे शाही जुन काही आपला जन्म यांना सत्तेवर बसवण्या साठी झाला आहे असे सर्वसामान्य जनतेला वाटल्या शिवाय राहाणार नाही
नगरपालीका नगरपंचायत निवडणुकीत महत्वाचे नगराध्यक्ष पदे नेत्यांनी आपल्याच घरातील बायको, आई, भाऊ, मुलगा, मुलगी
भाचा, त्याची बायको या कुटुंबातील सदस्यान्या
उमेदवारी दिली गेल्याची चर्चा आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांसाठी असतात असे
वरवर बोलायचे व माझे कुटुंब माझे नातेवाईक व बगलबच्चे यांना उमेदवारी द्यायची सर्वसाधारण जागेवर आता सर्वसाधारण उमेदवार उमेदवारी करायला स्वाभिमानी लोक नको म्हणतात कारण त्याना कोणी विचारात घेत नाही
त्यात अधिकृत पक्षाचे ए बी फाॅम मिळवण्या साठी आगोदर बगलबच्याची गर्दी तेव्हा नको ही उमेदवारी असे म्हणून या प्रक्रीया पासून अलिप्त राहणे बरे असे म्हणत दुर राहतात
नगरपालीका आणि नगरपंचायत निवडणुकीत घराणे शाही अवतरली आहे स्वतः आमदार की भोगली तरी माझ्या पोराला नगराध्यक्ष करा मग सामान्य कार्यकर्त्यांनी जायचे कुठे
सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त त्यांच्या सतरंज्या उचलायच्या, निवडणूकीत नेत्याचा नावांचा जयघोष करत झेंडे मिरवायचे, हाना मारी करुन आपल्या वर गुन्हे दाखल करुन घ्यायच्या, नेत्यांच्या बायका मुले मुलगी भाऊ बहिण आई यांच्या नावाने जयघोष करायचे
नेता गेला की त्याच्या पोराला उदबत्ती ओवाळून तुच तुझ्या शिवाय पर्याय नाही म्हणून
यांच्याच पालख्या कार्यकत्यांनी उचलायच्या, नेत्यांच्या नातवांचे डायपर बदलायचे याच कामासाठी नेत्यांना कार्यकर्ते लागतात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी नेत्यांनी आपल्या घरातील पत्नी,मुले, बायको, भाऊ, बहिण, आई यानाच उमेदवारी दिल्या आहे, निवडणुकीत हेच चित्र दिसते आहे, निवडणुकीत 50 टक्के पेक्षा जास्त पदे नेत्यांच्या नातेवाईकांना दिली गेली आहेत, नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदे नेत्यांच्या नातेवाईकांना साठी अनुकंपा तत्वावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे की काय असे चित्र आपण सर्वत्र पहात आहोत, पक्षाची बाजू मांडायला, लढाईला भांडायला, सामान्य कुटुंबातील, राजकीय वारसा नसलेले कार्यकर्ते, पदे भोगायला मंत्री आमदार खासदारांची मुले, मुलगी ,बायको, भाऊ, बहिण, आई, हीच खरी लोकशाही यालाच पुरोगामी महाराष्ट्राचे चित्र म्हणायचं का राज्याच्या विविध चॅनेल वर प्रवक्ते म्हणून पक्षाची बाजू यांच्या घरातला एकही चेहरा दिसणार नाही, चॅनेल वर पक्षांची बाजू मांडायला,भांडायला, मात्र सामान्य कुटुंबातील राजकीय वारसा नसलेले कार्यकर्तेच असतात प्रत्येक राजकीय पक्षांची प्रवक्ते पदे तपासून पाहिले तर नेत्यांच्या घरातील कोणाचे ही दिसणार नाही, नगराध्यक्ष पदासाठी मात्र आई, वडील, भाऊ, बहीण, आणि बायको यांचीच नावे दिसतील हे चित्र महाराष्ट्रात सगळीकडेच तुम्हाला पहावयास मिळतील,सध्याचे राजकीय पक्ष कुठे ही कोणा सोबत ही आघाडी युती करायला तयार आहे, कोण कोणाचा विरोधात, आणि कोणा सोबत लढताना दिसतो आहे,हे कळायला मार्ग नाही, एकमेंकांचे आई वडिलांचा उध्दार करणारे यंदाच्या निवडणुकीत एकमेकांना गळ्यात गळे घालून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत,जे सत्तेत मित्र आहेत ते निवडणूकीत एकमेकांच्या विरोधात हमरीतुमरीवर येऊन निवडणूक लढतांना दिसत आहेत, कोणाच्या ही अजेंड्यावर जनतेच्या हितासाठी कोणताच कार्यक्रम नाही, नगराध्यक्ष पदांवर आपल्याच नातेवाईकांना बसवून आपली सत्ता बळकट करण्यासाठी नेत्यांनी चालवलेली धडपड हाच अजेंडा आहे,याला कारणीभूत आहे मतदार,! जे मतदार एका रात्रीतून मेहरबान होतात आपल्या आयुष्यातील पाच वर्षं नेत्यांची गुलामी पत्करतात
आता सगळ्याच निवडणुका अवघड होऊन बसल्या आहेत सर्व सामान्य लोकांनी यात सहभाग घेऊ नये अशी पध्दशीर यंत्रणा कार्यरत असते निवडणूक प्रचार साठी बुढे नेते मंडळी बाहेर पडतात त्याच्या शेबड्या पोराला दादा म्हणून खुश कराव लागते
आपल्या कामाचा शहर विकासाचा विचार असलेले उमेदवार असतात मात्र त्यांना नेत्याने उमेदवारी न दिल्याने कोणी त्याच्या कडे लक्ष देत नाही प्रभाग असे बनवले की सर्वसामान्य उमेदवाराचा दम तुटला पाहीजे
सुशिक्षित तरुण निवडणुकीच्या फद्यात पडायला तयार नाहीत अण मतदानाला बाहेर पडायला तयार नाहीत
Comments
Post a Comment