कोपरगावात आक्का च्या नावावर तिकीट फाडत संधान साधले
घाडगे न्यूज |@ शिवाजी घाडगे
कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत पाहायला होऊन . या चुरशीच्या लढतीत भाजपाने अवघ्या ४०९ मतांनी राष्ट्रवादीला पराभूत करत नगराध्यक्ष पदांवर संधान साधले.
ही निवडणूक आमदार आशुतोष काळे आणि चेअरमन विवेक कोल्हे यांच्यातील राजकीय वर्चस्व सिद्ध करण्या साठी लढली गेली अखेर विवेक कोल्हे यांनी आपले उमेदवार पराग संधान यांना नगराध्यक्ष पदावर बसवून करत कोपरगाव शहरावरील आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे.
भाजपाचे उमेदवार पराग संधान यांना १८ हजार ५०३ मते मिळवून विजयी पताका फडकवली, तर राष्ट्रवादीचे ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांना १८ हजार ०९४ मते मिळाली. नगरसेवक निवडणुकीत भाजपाला १९, तर राष्ट्रवादीला ११ जागा मिळाल्या. अवघ्या ४०९ मतानी पराग संधान यांचा विजय झाला.
विशेष बाब म्हणजे, ओमप्रकाश कोयटे हे कोल्हे गटाशी संबंधित असतानाही ‘आक्का’च्या नावाने तिकीट फाडत त्यांना राजकीय कोंडीत पकडण्यात कोल्हे गट यशस्वी ठरला. ‘काकांचा पराभव म्हणजे आक्कांचा पराभव’ असा प्रचार शहरात प्रभावीपणे करण्यात आला.
या निवडणुकीत विकासाचे मूलभूत प्रश्न बाजूला राहिले. काका आणि आक्का या व्यक्तिकेंद्रित राजकारणा भोवतीच संपूर्ण निवडणूक फिरली. कोयटे यांनी कोल्हे कुटुंबाकडून आपल्याला वर्षानुवर्षे त्रास दिला जात असल्याचा आरोप निवडणुकीच्या काळात केला होता. निवडणूक वेळेवर झाली असती, तर आपण नगराध्यक्ष झालो असतो, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, भाजपाचे पराग संधान आणि राष्ट्रवादीचे ओमप्रकाश कोयटे यांच्याशिवाय दोन माजी नगराध्यक्षही रिंगणात होते. शिवसेना (शिंदे गट) कडून राजेंद्र झावरे, तर अपक्ष म्हणून सुहास वाढणे यांनी निवडणूक लढवली. दिवंगत माजी खासदार सूर्यभान वाढणे यांचे चिरंजीव असलेले सुहास वाढणे यांनी सलग दुसऱ्यांदा अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मागील निवडणुकीत ते अपक्ष म्हणून जनतेतून नगराध्यक्ष झाले होते.
भाजपाच्या जुन्या जनसंघकालीन निष्ठावंत नेत्यांचे वारस आज बाजूला पडत असून संधीसाधूंना महत्त्व दिले जात असल्याची भावना वाढणे समर्थकांमध्ये होती. त्यामुळेच वाढणे यांनी पुन्हा नगराध्यक्षपदासाठी मैदानात उडी घेतली मात्र नव्या समिकरणा मुळे त्याच्या पदरी निराशाच पडली
भाजपाने निवडणूक प्रचार साठी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन केले होते. मुख्यमंत्र्यांनी कोणावरही थेट टीका न करता ‘लाडकी बहीण’ योजना सुरूच राहील, असे सांगत महिलांनी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.
दरम्यान, कोपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून आगामी काळात शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळाले पाहीजे , नागरी सुविधा तसेच मिळायला हव्यात.
तर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना अधिक धार येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment