गोल्डन ओरिओल पक्षी सांगाना मी कसा दिसतो
घाडगे न्यूज | शिवाजी घाडगे
राहुरी तालुक्यात परदेशी पक्षाचे हिवाळ्यात आगमन झाले असून नदी काठावरील गारव्याला असे पक्षी पहावयास मिळत असून असाचा एक गोल्डन ओरिओल बेलापूर येथील केशव गोविंद विद्यालय पाहुणा म्हणून आला व चक्क गाडीच्या काचावर आपले रुपडै न्याहाळत बसला....
सांगाना मी कसा दिसतो
हिवाळा हा सर्वाना हवा हवासा वाटनारा रुतु असाच एक युरेशियन गोल्डन ओरिओल पक्षाचे आगमन राहुरी तालुक्यात झाले आहे असाच गोल्डन ओरिओल बुधवारी गाडीच्या काचावर आपले रुप न्याहाळत होता कदाचित म्हणत असावा सांगाना मी कसा दिसतो अस म्हणत पुन्हा वडाच्या झाडावर खारुताई, कावळा, चिमन्या बरोबर खेळु लागला तो होता युरेशियन गोल्डन ओरिओल पक्षी आपल्या पिवळसर तसेच काळपटपट्टी मोहक रुपाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले नाहीतर नवलच
मराठीत हळद्या, पिलक अशी नावे आहेत हा युरोप आणि पॅलेअक्टिफट मधुन उन्हाळ्यात स्थलांतरित होतो
हा पक्षी संपूर्ण भारत देशभर आढळतो. याचे इंग्रजी नाव गोल्डन ओरिओल (Golden Oriole) तर शास्त्रीय नाव Oriolus असे आहे.
नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या पंखांचा रंग काळा असतो तसेच याच्या डोळ्याजवळ काळ्या रंगाची पट्टी असते. मादी नरासारखीच पण किंचित फिक्या पिवळ्या-हिरव्या रंगाची असते. झाडांवर एकट्याने किंवा जोडीने आढळतो. झाडांच्या फांद्यांवर असला तरी हळद्या नजरेस पडणे जरा कठीणच, आवाजावरूनच तो ओळखू येतो.
फुलांमधील मध, विविध फळे आणि लहान किडे हे याचे मुख्य खाद्य आहे. याचे घरटे लहान, कपच्या आकाराचे गवत, कोळ्याच्या जाळ्याने व्यवस्थित विणलेले असते. विणीचा हंगाम एप्रिल ते जुलै असा असून मादी एकावेळी २ ते ३ पांढऱ्या रंगाची अंडी देते. पिलांचे संगोपनाची सगळी कामे नर मादी दोघे मिळून करतात.
Comments
Post a Comment