सुनेत्रा वहिनी महाराष्ट्राच्या पहिल्या उपुख्यमंत्री
घाडगे न्यूज। शिवाजी घाडगे
नवरा अकस्मात गमावण्याचे अपार दुःख असतानाही सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नवऱ्याच्या निधनानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी त्यांनी पदर खोचून पुन्हा सार्वजनिक जबाबदारी स्वीकारली. आयुष्यभर शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत, गोरगरीब व कष्टकरी जनतेसाठी कार्य करणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार दुर्दैवी विमान अपघातात काळाच्या पडद्याआड गेले. त्या अपघातानंतर घटनास्थळी उडालेली कागदपत्रे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळली जणू संपूर्ण व्यवस्था कोलमडल्याचेच ते प्रतीक होते.
कदाचित खासदार सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
अतिशय मनावर दगड ठेवून अथवा व्यक्तिगत मत बाजुला ठेवुन सहकाऱ्याच्या आग्रहा खातर सुनेत्रा पवार यांना शपथविधी उरकून घ्यावा लागला
त्यांनी हे पद इतक्या लवकर स्वीकारणे योग्य होते की नाही, याबाबत मतभेद असू शकतात आणि ते स्वाभाविकही आहेत. अजित पवारांचे दशक्रिया विधी अजून झाला नाही. आगोदर “अजित पवारांनंतर काय?”, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुढे काय होणार?” असे प्रश्न सर्वसामान्या बरोबर राज्यकर्ताना होते.
या धक्क्यातून समाज अजून सावरलेलाच नव्हता, तोपर्यंत नव्या नेत्याची निवड आणि शपथविधी हे सर्व इतक्या घाईने कसे झाले, असा सात्त्विक संताप अनेकांच्या मनात येणे सहाजिकच आहे. ही घाई कोणी आणि का केली, कोणाचा हा डाव होता, कोणाला आणि का अंधारात ठेवले गेले—या सर्व बाबींवर सविस्तर चिंतन होईल. मुळात राजकारणाची सूत्रे केव्हाच निसटली असून भारतीय राजकारणाची सध्याची अवस्था चिंताजनक आहे. म्हणूनच कदाचित अजित दादा राजकारण लई वंगाळ झाल राव अस म्हणारचे
मात्र येथे एका मुद्द्यावर थांबणे आवश्यक आहे—ही घाई का करण्यात आली?
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्रीच नव्हे, तर त्यांच्या पक्षाचा चेहरा आणि प्रमुख आधारस्तंभ होते. असा नेता अचानक जातो, “आता सर्व काही संपले” अशी भावना निर्माण होऊ न देता, परिस्थिती नियंत्रणात आहे आणि पुढे मार्ग आहे, असा ठाम संदेश देणे आवश्यक . अन्यथा सगळेच उधळून पडण्याची भीती असते.
जर काही दिवस कोणताही निर्णय झाला नसता, तर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली असती. घर दुःखात बुडालेले असले, तरी चर्चा थांबत नाहीत, अफवा थांबत नाहीत. गट-तट तयार होऊ लागतात आणि त्याचा फायदा घेण्यासाठी नको ते घटक सक्रिय होतात.
आता सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी खंबीर आणि गंभीरपणे काम करावे, विकास आणि विचार—या दोन्हींचे भान ठेवत पुढे जावे, हीच अपेक्षा आहे. कदाचित दादा इतक्या अकाली जातील आणि त्यांच्या दशक्रियाविधीच्या आतच पांढरी साडी नेसून, उघड्या बोडक्याने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागेल, असे स्वप्नातही सुमित्रा पवार यांनी पाहिले नसेल. मात्र आज वेळ अशी आली आहे की स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.
सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या झाल्या असून, राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली आहे. आगामी काळात अनेक कठोर आणि धाडसी निर्णय त्यांना घ्यावे लागणार आहेत—कदाचित दादा ज्या धाडसाने निर्णय घेत, त्याच निर्धाराने.
Comments
Post a Comment