मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ात खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा
राहुरी।
 राज्यातील सर्वशासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, बँका आदी ठिकाणांवरून राजभाषा मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धकांनी १) मराठी भाषेचा इतिहास, २) मी आणि माझे लेखन ३) करू मातृभाषेचा सन्मान, महाराष्ट्र घडवू आपला महान, ४) मराठी भाषा आहे सक्षम, करण्या संस्कृतीचे रक्षण, ५) मराठी आमुचा अभिमान, मराठी आमुचा स्वाभिमान. यापैकी एका विषयावर कमीत कमी ५०० शब्द मर्यादेपर्यंत निंबंध २३ जानेवारी २०२६ पर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालय, भुतकरवाडी, सावेडी, अहिल्यानगर येथे पोस्टाने किंवा समक्ष जमा करावे.

विजेत्या स्पर्धकांचा ग्रंथोत्सवात मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान पत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. असे अशोक गाडेकर प्र. ग्रंथालय संचालक यांनी कळविली आहे. अधिक माहितीसाठी रामदास शिंदे, निरीक्षक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्याशी संपर्क साधा.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर