राहुरीत आमदार नाही महामार्ग साडेसाती त्यात आता हेल्मेट सक्ती

राहुरीत आमदार नाही अधिकारी मुजोर?  महामार्ग  साडेसाती कधी संपणार त्यात हेल्मेट सक्ती!
घाडगे न्यूज। प्रतिनिधी 
राहुरी तालुक्याला सध्या आमदार नाही, आणि याच संधीचा गैरफायदा घेत अधिकारी वर्ग अधिकच शिरजोर झाला आहे का, असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. नगर–मनमाड राज्य महामार्गावर अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नाही. गेली अनेक वर्ष झाले काम सुरु आहे 
कडेने गॅस पाईपलाईन गेली ती पुर्ण झाल्यावर काम पूर्ण होईल अशी चर्चा आहे 
 दररोज जीवघेणे अपघात, मृत्यू, जखमी—परंतु प्रशासन मात्र अजूनही ढिम्मच आहे.
रस्त्यावर मोकाट फिरणारी अवजड वाहने, नियम धाब्यावर बसवलेले ढपर, क्षमतेपेक्षा अधिक भार—या सर्वांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना राहुरी पोलीस केवळ हेल्मेट तपासणीपुरतेच आपले कर्तव्य मर्यादित ठेवत असल्याचे चित्र आहे. नियम पाळणे गरजेचेच आहे; मात्र फक्त गोरगरीब शेतकरी, कामगार, दुचाकीस्वार यांनाच लक्ष्य करून कारवाई करणे म्हणजे सोपी शिकार नाही का?
तालुक्यात अवैध व्यवसायांचे पेव फुटलेले असताना त्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलिसांकडे आहे का, असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत. गावठी दारूच्या विळख्यात अनेकांचे आरोग्य उद्ध्वस्त झाले आहे; लिव्हरचे आजार वाढत आहेत. बसस्थानक परिसरात काय चालते, हे सर्वांना माहिती आहे—मात्र त्याकडे मुद्दाम डोळेझाक का?
“वरूनही पोलीस कारवाई होणार का?” अशी चर्चा राहुरीत उघडपणे सुरू आहे. शनिशिंगणापूर फाट्यावर शनि भक्तांसाठी जणू साडेसातीच सुरू आहे. एकीकडे शनि परवडावा, पण पोलीस नकोत अशी भावना निर्माण झाली आहे, हे प्रशासनासाठी धोक्याचे लक्षण नाही का?
आमदार नसल्याने जनतेने नाकारलेले काही राजकीय चेहरे राहुरीत येऊन लुडबुड करत आहेत, तर दुसरीकडे अधिकारी अधिकच मुजोर होत चालले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुरीतील तथाकथित “चकाचक” मंडळी अधिकारी वर्गाचे बुके देऊन सत्कार करण्यात मग्न आहेत—ही शोकांतिका नाही तर काय?
जनतेला नियमांची शिस्त हवी आहे, पण ती सर्वांसाठी समान असली पाहिजे. अपघात थांबवायचे असतील, तर फक्त हेल्मेट नव्हे—अवैध व्यवसाय, अवजड वाहने आणि प्रशासनाची बेफिकिरी यांवरही कारवाई अपरिहार्य आहे.
तर दुसरीकडे अवैध व्यवसाय जोरात असून आपल्याला शासकीय परवाना असल्याच्या अविर्य भावात वागतात 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन