वाणीची मका अण बिबट्याची डरकाळी
देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर माऊली वाणी यांच्या मकाच्या शेतात शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली. शेतात काम करत असलेल्या महिलांसमोर बिबट्याने अचानक डरकाळी फोडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती समजताच प्रहार संघटनेचे आप्पासाहेब ढूस, मच्छिंद्र तांबे, विजय गव्हाणे, चंद्रकांत कराळे, गणेश भालके व दादा वाणी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ज्ञानेश्वर वाणी, दत्ता वाणी, ओम वाणी, साई वाणी, श्रीराम वाणी, सार्थक वाणी, अथर्व वाळके आदींनी फटाके फोडून बिबट्याला पळवून लावले.
Comments
Post a Comment