तोच जिव्हाळा उत्साह कायम पुण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ

 जिव्हाळा कायम…
दिघीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची स्नेहभेट
राहुरी : नोकरीच्या बदल्या, जबाबदाऱ्या आणि काळाच्या ओघात अनेक नाती मागे पडतात; मात्र काही नाती अशी असतात की वर्षानुवर्षे लोटली तरी त्यांचा जिव्हाळा तसाच टिकून राहतो. पुणे येथील दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या राहुरीतील भेटीतून याच भावनेचा प्रत्यय आला.
रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना प्रमोद वाघ यांनी राहुरी फॅक्टरी येथे थांबून जुन्या मित्रांची स्नेहभेट घेतली. तब्बल नऊ वर्षांपूर्वी ते राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्या काळात त्यांनी केवळ पोलीस अधिकारी म्हणून नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते.
बदली होऊन अनेक वर्षे उलटून गेली असली तरी राहुरीतील मित्रमंडळी आणि परिचितांशी असलेले त्यांचे स्नेहबंध आजही तेवढ्याच आत्मीयतेने जपले गेले आहेत. शिर्डीकडे जाताना राहुरीत थांबण्याचा त्यांचा निर्णय हा त्या आठवणींना आणि नात्यांना दिलेला मान असल्याचे मित्रांनी सांगितले.
या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा देत मित्रमंडळींसोबत मनमोकळ्या गप्पा रंगल्या. एकेक प्रसंग आठवत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आपुलकीचे भाव उमटले. नोकरीच्या बदल्या होतात, पदे बदलतात; पण मनात जपलेले स्नेहबंध मात्र काळाच्या ओघातही तितकेच घट्ट राहतात, याचा प्रत्यय या स्नेहभेटीतून आला.
शेवटी मित्र महत्वाचे असतात अस त्याना वाटत वय बरोबर आत्मविश्वास देखील म्हातारा होते असे त्यांनी केलेल्या गप्पा दरम्यान सांगत होते शिक्षण घेऊन भारतात कोठे नोकरी करावी पुण्यात आईवडील घरात कधी देह सोडून जातात हे परदेशात असलेल्या मुलांना कळत देखील नाही 
गरजे पुरता पैसा हवा मात्र त्याचा उपभोग घेता आला पाहीजे स्वतःला सिध्द करण्या साठी किमान २५ वर्ष लागतात कोणी ही एका रात्रीत श्रीमंत होत नाही व झाला तरी टिकत नाही पुण्यातील नोकरी व अहिल्यानगर मधील नोकरीत मोठी तफावत आहे प्रेम आपुलकी व आपले पणाने या भुमीत एकरुप झालो मात्र रंगपंचमी दिवशी आठवणींच्या रंगात स्नेह भेटीची ऊब 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन