पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या हातात लग्नांच्या बेड्या

पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे याच्या हातात लग्नांच्या बेड्या 
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
 कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज कारवाईमुळे नगर जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण करणारे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे शनिवारी विवाहबंधनात अडकले. त्याच्या हातात लग्नांच्या  बेड्या अडकल्या संभाजीनगर येथील ‘सूर्या लॉन्स’ येथे पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला.
मुळचे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील  संतोष खाडे हे अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेले अधिकारी आहेत. ऊसतोड मजुराच्या कुटुंबातील मुलगा असलेल्या खाडे यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर शिक्षण पूर्ण करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक पदावर निवड मिळवली.
सेवेत दाखल झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशिक्षण काळातच त्यांनी धाडसी व प्रभावी कारवायांमुळे स्वतःची वेगळी छाप उमटवली. गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेत त्यांनी अल्पावधीतच जनतेत विश्वासार्ह अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली.
खाडे यांच्या लग्नसोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साध्या कुटुंबातून पुढे येत प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या या अधिकाऱ्याच्या आयुष्यातील या नव्या पर्वासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन