राहुरी पोटनिवडणूकीतील सर्व्हेने धाकधूक कोणाची वाढवली

राहुरी पोटनिवडणुक सर्वेक्षणाने धाकधूक नेमकी कोणाची  वाढवली 
 रंग तंरग।शिवाजी घाडगे 
राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची अधिकृत घोषणा भारत निवडणूक आयोगाने केली असून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी गुरुवार, २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून सोमवार, ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. 
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डाॅक्टर पंकज आशिया यांनी देखील सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत तसे अधिकृत रित्या जाहीर केले 
सर्व साधारण उमेदवारास निवडणूक लढवण्या साठी रुर10000 अनमात रक्कम असून अनुसूचित जाती जमाती साठी रु5000 अनामत आहे राहुरी, नगर तालुका, पार्थडी तालुक्यातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत 
दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या आकस्मिक निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार कोण असेल, याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. तरीही युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नावाच्या पोस्ट सोशल मीडियावर भाजप समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तेच भाजपचे उमेदवार असतील, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.
दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर कुटुंबावर आलेले राजकीय आणि वैयक्तिक आव्हान अक्षय कर्डिले यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकेकाळी ज्यांना सरकारी यंत्रणा आणि प्रशासन सलाम करत होते, त्या दिवंगत आमदारांच्या वारसाला राजकीय व्यासपीठावर अद्याप पूर्ण मान्यता मिळालेली नाही, अशीही काही कार्यकर्त्यांची भावना आहे. मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या व्यासपीठावरही त्यांना अग्रस्थानी स्थान मिळत नसल्याच्या चर्चाही राजकीय पातळीवर सुरू आहेत. दुसरीकडे काही जण त्यांच्या भूतकाळातील मुद्दे उकरून काढण्यात व्यस्त असल्याचेही दिसते.
दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यांनी अद्याप कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, हे स्पष्ट केलेले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला दुखावणारी कोणतीही भूमिका त्यांनी घेतलेली नाही. त्यांच्या गळ्यातील भगवे उपरणे मात्र काही वेगळेच संकेत देत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्रिपद मिळण्यात त्यांचे मामा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा प्रभाव महत्त्वाचा होता, असे मानले जाते. दरम्यान, राज्यात भाजपा-शिंदे शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, अकोल्याचे आमदार किरण लहामटे, नगरचे आमदार संग्राम जगताप आणि पारनेरचे आमदार निलेश लंके हे चारही आमदार सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे त्या मतदारसंघांमध्ये विद्यमान पक्षांना संधी देण्यात आली. नंतर निलेश लंके खासदार झाले आणि उर्वरित तीनही आमदार पुन्हा निवडून आले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, प्राजक्त तनपुरे हे जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘दादा’ गटात कायम राहिले असते, तर त्यांची पुन्हा आमदार म्हणून निवड होण्याची शक्यता प्रबळ होती. कारण त्यांनी यापूर्वी दिवंगत शिवाजी कर्डिले यांचा पराभव करून राहुरी मतदारसंघात विजय मिळवला होता.
तनपुरे कुटुंबाला राजकारणाचा मजबूत वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा दादासाहेब तनपुरे हे राहुरीचे आमदार होते. त्यांचे वडील सलग पंचवीस वर्षे आमदार आणि तेरा महिने खासदार राहिले. तसेच त्यांच्या आजोळीही दिवंगत माजी मंत्री राजाराम पाटील आणि मामा जयंत पाटील यांनी अनेक वर्षे मंत्रीपद भूषवले आहे. त्यामुळे भक्कम राजकीय आणि वैचारिक परंपरेच्या बळावर आपण पुन्हा विधानसभेत पोहोचू शकतो, असा विश्वास प्राजक्त तनपुरे व्यक्त करत आहेत.
दरम्यान, मतदानापूर्वी काही अनौपचारिक सर्वेक्षणे झाल्याची चर्चा मतदारसंघात रंगत आहे. दिवंगत आमदारांच्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन अक्षय कर्डिले विजय मिळवतील का, तसे दिवंगत नेते शिवाजी कर्डिले यांचे राजकारण हे प्रस्थापित घराण्याच्या विरोधात होते ते नगर तालुक्यात तीनदा व राहुरीत तीनदा आमदार झाले  
 दिवंगत खासदार दादा पाटील शेळके, माजी खासदार यशवंतराव गडाख, माजी खासदार प्रसाद तनपुरे आदी मातब्बर विरोधात दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले राजकारणात यशस्वी झाले शिवसेना युती सरकार मध्ये ते देखील राज्यमंत्रि देखील झाले 
 की आपल्या अनुभवाच्या जोरावर प्राजक्त तनपुरे पुन्हा विधानसभेत पुनरागमन करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या दोन्ही प्रमुख नावांव्यतिरिक्त इतर काही उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राहुरीची ही पोटनिवडणूक केवळ एक जागेची लढत न राहता जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांची कसोटी ठरणार, हे निश्चित.
आजु बाजुला युध्द जन परिस्थितीने सर्व सामान्य लोक हतबल आहेत  हे युध्द नेमके किती दिवस राहणार हे अस्पष्ट आहेच कोरोनात ऑक्सिजन व आता गॅसने लोक हैराण व चिंताग्रस्त असून प्रचंड प्रमाणात कृत्रिम महागाई सामोर्य जात आहेत  शेती मालाचे पडलेले भाव तसेच समुद्रात अडकुन पडलेले फळे नासले आहेत. 
अशा परिस्थितीत राहुरीचे मतदार नेमके कोणाला पंसत करतात हे देखील मतदाना नंतर समजेल 
सध्या मतदार संघात केल्या गेलेल्या मतदान पूर्व सर्व्हे ची जोरदार चर्चा चालु आहेच. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर