बाबांनी तारले केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डीत

बाबांनी ‘तारले’ केंद्रीय मंत्री रामदास आठवले  शिर्डीत
रविवार विशेष।शिवाजी घाडगे 
शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकेकाळी राजकारणाचा गंध नसलेले आणि प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले भाऊसाहेब वाकचौरे खासदार म्हणून निवडून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. पंढरपूरमधून निवडून येण्याची अपेक्षा असताना शिर्डीतील हा पराभव आठवले यांच्या जिव्हारी लागला होता.
त्याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले हेही नगर दक्षिणमध्ये पराभूत झाले होते. त्या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवण्याचा विचार केला होता. मात्र ते साध्य झाले नाही आणि अखेरीस पवार यांनी दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांना राज्यसभेची संधी दिली.
यानंतर रामदास आठवले आणि दिवंगत शिवाजी कर्डिले हे दोघेही भाजपसोबत राजकारणात सक्रिय झाले. रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवत आठवले भाजपसोबत असले तरी ते सर्वच पक्षांना परवडणारे नेते मानले जातात. कार्यकर्त्यांना कोरे लेटरपॅड देऊन काम करण्याची संधी देणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे.
संसदेत आपल्या खास शैलीतील भाषणांमुळे आणि विनोदी टिप्पण्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हसवणारे नेते म्हणून रामदास आठवले प्रसिद्ध आहेत. राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आपल्या खास शैलीत हसवले.
दरम्यान, रविवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहेत. शिर्डीत पराभव झाला असला तरी साईबाबांच्या कृपेनेच आपण नंतर संसदेत बिनविरोध पोहोचलो, अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे “बाबांनीच तारले” असे म्हणण्यास वाव आहे. दर्शनानंतर आठवले पत्रकार मित्रांशीही संवाद साधणार असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे आज  खासदार शरद पवार,खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि रामदास आठवले हे तिघेही संसदेत आहेत. एकेकाळी इतरांना खासदार बनवणारे शरद पवार यांच्या प्रमाणे , केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मात्र संसदेत पोहोचण्यासाठी तुलनेने फार कष्ट घ्यावे लागले नाहीत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नसल्याचे आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केल्यानंतर काँग्रेसची भूमिकाही बदलली.
राजकारणात कोणत्या क्षणी कोणती परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नसले तरी शेवटी यशालाच महत्त्व असते, हे या घटनांमधून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
राजकारणात पराभव आणि यश यांचा खेळ सतत चालू असतो. कधी मतदारांचा कौल साथ देतो, तर कधी जनतेचा निर्णय नेत्याला कठोर वास्तवाची जाणीव करून देतो. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले, तर हा चढ-उतारांचा प्रवास स्पष्टपणे दिसून येतो.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्या वेळी प्रशासकीय सेवेतून आलेले आणि राजकारणाचा गंध नसलेले भाऊसाहेब वाकचौरे खासदार झाले. हा पराभव आठवले यांच्या जिव्हारी लागला होता. त्याच काळात नगर दक्षिणमधील राजकीय समीकरणेही बदलत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
त्या काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आठवले यांना राज्यसभेत पाठवण्याचा विचार केल्याची चर्चा होती; मात्र ती संधी आठवले यांनी झिटकली कारण पराभवाच्या धक्क्यातून ते सावरले नव्हते आठवले यांच्या विरोधात जो जातीय वादी प्रचार झाला त्याने आठवले व्यथित झाले होते. 
 त्यानंतर राजकारणातील समीकरणे बदलली. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवत भाजपसोबत वाटचाल सुरू केली. आज ते केंद्रात मंत्री आहेत आणि राज्यसभेत बिनविरोध खासदार म्हणून कार्यरत आहेत.
रामदास आठवले यांची राजकीय शैली इतर नेत्यांपेक्षा वेगळी मानली जाते. संसदेत त्यांच्या खास विनोदी शैलीमुळे अनेकदा वातावरण हलके होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी आपल्या भाषणातून अनेकदा हसवले आहे. कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध राहणारा आणि कोरे लेटरपॅड देऊन काम करण्याची संधी देणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे.
आज आठवले शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहेत. एकेकाळी ज्या मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला, त्याच ठिकाणी आज ते केंद्रीय मंत्री म्हणून येत आहेत, ही राजकारणातील परिस्थिती किती वेगाने बदलते याची आठवण करून देणारी बाब आहे. अनेक समर्थकांच्या मते, शिर्डीतील साईबाबांच्या कृपेनेच त्यांचा राजकीय प्रवास पुढे सरकत राहिला.
विशेष म्हणजे आज शरद पवार, भाऊसाहेब वाकचौरे आणि रामदास आठवले हे तिघेही संसदेत आहे व यांच्या जोडीला पार्थ पवार देखील 
 एकेकाळी राजकीय समीकरणे वेगळी होती; आज परिस्थिती बदलली आहे. राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, फक्त परिस्थिती बदलत असते, हेच या घटनांतून दिसते.
शेवटी राजकारणात कोणत्या क्षणी कोणता वळण येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र संघर्ष, संधी आणि नशिबाची साथ मिळाली, तर पराभवाच्या सावटातूनही यशाचा मार्ग निघू शकतो याचे उदाहरण म्हणजे रामदास आठवले यांचा प्रवास होय.
बाबांनी म्हणजे भारत रत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील 
कारण कमळात कपबशी ठेवायची कशी यांची कसब आठवलेंना आठवली अण केंद्रात आपले स्थान मजबूत केले 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन