अवकाळी वारा अण गाराचा पाऊस
राहुरी : राहुरी तालुक्यात गुरुवारी दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास अचानक वातावरणात मोठा बदल होत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुपारपर्यंत वातावरण उष्ण असताना अचानक ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्यासह गारपीट सुरू झाली. काही भागात गारांचा मारा इतका तीव्र होता की उभ्या पिकांना फटका बसला. विशेषतः भाजीपाला, फळबागा आणि रब्बी हंगामातील पिकांवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आधीच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे (शेजारी राष्ट्रांतील युद्धजन्य स्थितीमुळे) शेतीमालाच्या बाजारभावात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, आता अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तासांत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवली असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment