राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकीत कर्मचारी प्रशिक्षण पुर्ण

राहुरी विधानसंभा पोटनिवडणूक कर्मचारी प्रशिक्षण पुर्ण 
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या 2026 च्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 2,596 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण पूर्ण झाले. हे प्रशिक्षण नानासाहेब पवार सभागृह, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी तसेच सावित्रीबाई फुले हायस्कूल, राहुरी येथे 3 व 4 एप्रिल या दोन दिवसांत पार पडले.
या प्रशिक्षणात 2,268 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला, तर एकूण 328 अधिकारी व कर्मचारी गैरहजर होते. प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांना प्रात्यक्षिकांसह ईव्हीएम मशीन हाताळणीचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणासाठी निवडणूक निरीक्षक देवानंदा रेयांग, डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव, जिल्हा नोडल अधिकारी श्रीमती गौरी सावंत तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमित पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशिक्षणाची जबाबदारी निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. तसेच हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी निवडणूक नायब तहसीलदार बडे, महसूल नायब तहसीलदार बाचकर, सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सर्व झोनल अधिकारी तसेच मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर