जिल्ह्यातील पोलीस दादा बदल्याना मुर्हुत
घाडगे न्यूज @प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील बहुप्रतीक्षित प्रशासकीय बदली प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला असून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गुरुवारी पोलीस मुख्यालयात विनंती
बदली बैठक प्रक्रियेत राबविण्यात आली
जिल्ह्यातील सुमारे 300 पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे आणि शाखांमध्ये सलग अथवा खंडित स्वरूपात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अंमलदारांकडून यापूर्वीच बदलीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या पसंतीच्या तीन ठिकाणांचा उल्लेख करून अर्ज सादर केले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कार्यकाळात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, 30 एप्रिल रोजी त्यांच्या बदलीनंतर प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया खोळबली होती. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी प्रलंबित प्रक्रिया पुन्हा गतीमान केली असून बदलीपात्र अंमलदारांना गुरुवारी सकाळ पासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते . प्रत्येक अंमलदाराची वैयक्तिक भूमिका, सेवा नोंद तसेच पसंतीच्या ठिकाणांचा विचार करून बदल्या होणार.
या बदली प्रक्रियेत पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावरील अंमलदारांचा समावेश आहे. एका पोलीस ठाण्यात सलग पाच वर्षे सेवा पूर्ण केलेले, एका तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले तसेच विविध शाखांमध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावलेले कर्मचारी बदलीस पात्र ठरले आहेत.
40 पोलिसांना पदोन्नती
दरम्यान, जिल्हा पोलीस दलातील 40 पोलिसांना पदोन्नती देण्याचे आदेशही पोलीस प्रशासनाने निर्गमित केले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी 20 पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदावर तर 20 पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक (सहायक फौजदार) पदावर पदोन्नती देण्यास मंजुरी दिली आहे.
पदोन्नतीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सहकारी, अधिकारी आणि कुटुंबीयांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बदली आणि पदोन्नती या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी राबविण्यात येत असल्याने जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment