Posts

राज्यात नऊ कोटी 70 लाख मतदार नोंदणी

Image
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी  ९ कोटी ७० लाखांहून अधिक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९, महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ तर तृतीयपंथी मतदार ६ हजार १०१ इतक्या मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४५ लाख ७९ हजार २१६ पुरूष मतदार, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ८०५ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ३ लाख ३६ हजार ९९१ पुरूष मतदार, ३ लाख ४१ हजार ९३४ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ३ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. या व्यतिरिक्त राज्यात सेवादलातील (सर्व्हिस व्होटर) १ लाख १६ हजार १७० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये १ लाख १२ हजार ३१८ प...

श्रीरामपूरात तीन पोलीसांनी लाच घेतली म्हणून कारवाई

Image
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे तीन पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ताब्यात   रघुवीर कारखिले, गौतम लगड व राहुल नरोडे यांनी मटका सुरू ठेवण्यासाठी मागितली होती लाच व दारूची बाटली.. कारखिलेचे अनेक कारनामे..! एकीकडे अवैध व्यावसायवर आचारसंहिता काळात छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले  हे तीन पोलीस लाच घेऊन कोणाच्या घशात घालत होते हे तपासात कळणार  तर दुसरीकडे कर्जत येथील एका संभेत खासदार निलेश लंके यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे नाव न घेता सत्ता आल्यावर यांना नक्षल क्षेत्रात पाठवू असा इशारा दिला आहे  तक्रारदार-पुरुष,वय- 40 वर्षे आलोसे  रघुवीर ओंकार कारखिले, पोलीस नाईक, बक्कल नंबर 232, वर्ग-3,  राहुल महादेव नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल, बक्कल नंबर 651, वर्ग-3, गौतम शंकर लगड, पोलीस कॉन्स्टेबल, बक्कल नंबर 717, वर्ग-3, सर्व नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर लाचेची मागणी           6000/- रुपये तडजोडीअंती 5,000/- रुपये व 2600/- रुपये किंमतीची हंड्रेड पाईपर कंपनीची दारूची बाटली दिनांक -06/09/2024 लाच स...

आचारसंहिता कडक अमलबजावणी करावी- अरूणकुमार

Image
आचारसंहिता अंमलबजावणी काटेकोर पणे करावी  - निवडणूक निरीक्षक अरूणकुमार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा  - आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना केंद्रीय निवडणूक निरीक्षक अरूण कुमार यांनी दिल्या. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आणि टाकळीभान येथील भरारी पथकांना भेटीप्रसंगी त्यांनी या सूचना दिल्या.   निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, सहाय्यक निवडणूक अधिकामिलिंद कुमार वाघ, नगरपरिषद मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे आदी उपस्थित होते.  यावेळी अरूणकुमार यांनी निवडणुकीचे नोंदणी कार्यालय, स्ट्रॉंग  रूम, एमसीसी, कंट्रोल रूम, साहित्य विभाग, कार्यालयात असलेली सीसीटीव्ही आणि आचारसंहिता कक्षाची पाहणी केली. नियंत्रण कक्षाला भेट देऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.  श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीमधील टाकळीभान येथील...

श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने वसुबारस

Image
आज सोमवारी गोरज मुहूर्त वर वसुबारस सणा निमित्त गोपाल कृष्ण गोशाळा राहुरी येथे वासरा सह गोमातेची विधीवत पूजा करण्यात आली   भारत सरकार च्या वतीने जलनायक पुरस्काराने गौवरविलेले पत्रकार  शिवाजी घाडगे सपत्नीक यांनी गोमातेची विधीवत पूजा केली   त्यावेळी आमचे मार्गदर्शक जैन समाजाचे जेष्ठ श्री कांतीलालजी लोढा, भास्करराव कोळसे, गांडुळे भाऊसाहेब, आशिष राका,भाऊसाहेब गुंजाळ,सुरेश बागुल ,डॉक्टर हर्षद चोरडिया,डॉक्टर प्राची चोरडिया, ललित चोरडिया,भारती चोरडिया, बाळासाहेब नेमाने, बाळासाहेब झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते अलिकडेच महाराष्ट्र शासनाचा वंसतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल   पत्रकार शिवाजी घाडगे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा सत्कार गो शाळेच्या वतीने स्नेह सत्कार कांतीलालजी लोढा यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी  गांडुळे भाऊसाहेब ,कोळसे पाटील , शोभाताई पिपाडा यांच्यावतीने गोमातेसाठी देणगी देण्यात आली सर्व देणगीदार व उपस्थित मान्यवरांचे

पुणे कृषि महाविद्यालयांच्या वतीने वसुबारस उत्साहात

Image
पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात वसुबारसेचा सण उत्साहात बदलत्या हवामान परिस्थितीत देशी गायींचे महत्व अनन्यसाधारण - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील  देशी गोपालनाच्या माध्यमातून शेतकर्यांना शाश्वत व फायदेशीर उत्पादनाचा स्त्रोत आहे. सध्याच्या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये देशी गाईंना अनन्य साधारण महत्व असून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत त्यांचे संगोपन, संवर्धन करून उत्पादनात भरीव वाढ घडविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.  पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये वसुबारसेचा सण पारंपारिक पद्धतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी उपस्थितांसह सवत्स धेनूचे पूजन केले. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी कामधेनू विद्यापीठ, गांधीनगर, गुजरात तथा आणंद, गुजरात येथील आणंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम.सी. वार्ष्णेय, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे माजी ...

श्रीकृष्ण गोपाल संस्थेच्या वतीने वसुबारस

Image
दिपावलीच्या आगोदर येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्या वद्य व्दादशीला या दिवशी साजरा केला जातोय याला गोवत्स व्दादशी म्हणून ओळखले जाते  भारत हा कृषी प्रधान देश आहे. गाय म्हणजे गो माता ती दुध देते व शेतकर्याला समृध्द करीत समृध्दी करते तशेच शेण खतातुन भुमातेला समृध्द करते  वसुबारसेला घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या...

नगर,अकोल्यात दिली तुतारी. श्रीरामपूरात काॅगेसने कापले कानडेचा पंजा

Image
खासदार शरद पवार यांनी दिली अभिषेक कळमकर व अमित भागरे याच्या हातात दिली तुतारी  लोकसंभा निवडणूकीत करिष्मा करुन दाखविला तसा आता होऊ घातलेल्या 20 नोव्हेंबर निवडणूकी साठी नगर साठी माजी महापौर अभिषेक कळमकर व अकोले मध्ये अमित भागरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे नगर मध्ये विद्यमान आमदार संग्राम जगताप व अभिषेक यांची लढत होईल म्हणेजे येथे पुन्हा घड्याळ टिक टिक करनार की तुतारीचा आवाज येणार आमदार संग्राम जगताप विजयाची हॅटट्रीक साधायला तयार आहेत तर अभिषेक देखील माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या अनुभवाचा यथोचित वापर करणार आहेत यामुळेच नगरची लढत लक्षणीय होणार  तर अकोल्यात आमदार  किरण लहामटे यांना शरद पवार यांनी मागील पाच वर्षांपुर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठात अतिथी गृहावर सायंकाळच्या भेटी दरम्यान  माजी आमदार मधुकर पिचड याचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांच्या विरोधात उभे करुन निवडुन आनले होते मात्र आमदार किरण लहामटे दादा राष्ट्रवादी बरोबर गेले व आता आमदार किरण लहामटे यांना राष्ट्रवादी दादा गटा तर्फे उमेदवारी दिली आहे येथे अमित भागरे यांच्या वडील दिवंगत  अशोक भा...